
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
विश्रांतवाडी – साधारणत: तुरुंग म्हणजे गुन्हेगारांना आत टाकण्याची जागा… पण इथले काही अधिकारी आणि कर्मचारी मात्र स्वतःच्या सचोटीनेच ‘कुलूपबंद’ राहिले! स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट २०२५) निमित्ताने, मा. राष्ट्रपतींनी या निष्ठावान सेवकांचा ‘गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचा’ पदकाने गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जाहीरनाम्यानंतर कारागृह विभागात आज चावीपेक्षा अभिमान जड झाला आहे.
सन्मानितांचा ताफा
* ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राणी राजाराम भोसले व अतिरिक्त अधीक्षक राजाराम रावसाहेब भोसले – कुलूप उघडायचं ते फक्त कायद्याच्या पुस्तकानुसार!
* मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक गजानन काशिनाथ सरोदे, सुभेदार संजय गंगाराम शिवगण आणि हवालदार सुधाकर ओंकार चव्हाण – इथल्या भिंतीवर शिस्तीचं लेपन!
* भायखळा जिल्हा कारागृहातील हवालदार राजेश मधुकर सावंत व संजय सदाशिव जाधव – कुलूप घट्ट, पण विश्वास घट्टच!
* कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील कारागृह शिपाई विद्या भरत ढेंबरे – ‘ड्यूटी’ हा शब्द अजूनही शुद्ध उच्चारात!
कारागृह विभागाचे उद्गार
अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक सुहास वारके व विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले – “ही फक्त पदके नाहीत, तर हे संदेश आहेत की कारागृहाच्या भिंती फक्त कैद्यांना नाही, तर सचोटीला पण जपतात.”