
अहिल्यानगर प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नायगाव गावात रविवारी संध्याकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सासरच्या अमानुष छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने दोन चिमुकल्या लेकरांसह विहिरीत उडी घेत स्वतःचं आयुष्य संपवलं. गावभर हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने जिल्हा हादरला आहे.
मृतांमध्ये रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६) आणि साक्षी उगले (वय ४) यांचा समावेश आहे.
रुपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्या फिर्यादीवरून रुपालीचा पती नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले, नणंद मनीषा शिवाजी टाळके आणि नणंदेचा पती शिवाजी गोरख टाळके यांच्यावर खर्डा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतरचा छळाचा काळ
आठ वर्षांपूर्वी रुपालीचं लग्न नाना पंढरीनाथ उगले याच्याशी झालं. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता, पण दोन-तीन वर्षांनंतरच सासरच्या मंडळींकडून पैशासाठी त्रास सुरू झाला.
मागील दोन वर्षांपूर्वी सासूचं निधन झाल्यानंतर घरातील कामाचा बोजा, विहीर खोदण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा दबाव वाढला. नणंद मनीषा हिच्याकडून “भावाला दुसरं लग्न करून देईन, तुला काहीच काम येत नाही” असे अमानुष टोमणे ऐकावे लागत होते.
८ जुलैच्या संध्याकाळी, जड अंतःकरणाने रुपालीने दोन निरागस लेकरांचे हात धरले… आणि नायगावच्या विहिरीत उडी घेतली. पाण्याच्या थंडगार लाटांनी क्षणात तिघांचे आयुष्य गिळंकृत केले.
घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत करत आहेत. या घटनेने नायगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यांत एकच प्रश्न — “एवढा छळ की, लेकरांसह आईनेच मृत्यूला कवटाळलं