
नवी दिल्ली वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गुरुवारी INDIA आघाडीतील महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी नेत्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
बैठकीत उद्धव ठाकरे यांना “शेवटच्या रांगेत” बसवण्यात आल्याचा मुद्दा भाजप व शिंदे गटाने चघळायला सुरुवात केली. परंतु संजय राऊत यांनी हा सगळा वाद फालतू असल्याचं स्पष्ट करत भाजप-शिंदे गटाला जोरदार झापलं.
राऊतांचा खुलासा – “उद्धवजी स्वतः मागे गेले”
“समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं. पुढच्या रांगेत बसल्यास नीट दिसत नव्हतं, म्हणून उद्धवजी स्वतः मागे आले. त्यांच्या शेजारी शरद पवार, कमल हसन होते. रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल, सोनिया आणि प्रियंका गांधींनी नवीन घर दाखवलं. मग ‘मागे बसवले’ ही भाजप IT सेलची स्वस्त थियरी आहे,” असं राऊतांनी सांगितलं.
म्हस्केंवर थेट प्रहार – “दुतोंडी गांडूळ”
उद्धव ठाकरेंवर “दिल्लीमध्ये महाराष्ट्राची लाज काढली” अशी टीका करणारे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर राऊत तुटून पडले.
“त्यांना सांगा, दुतोंडी गांडूळ! बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडताना मान-अपमान दिसला नाही का? दिल्लीला जाऊन मोदी-शाहांची चाटुगिरी करताना शिवरायांचा महाराष्ट्र आठवत नाही का?” असा थेट सवाल राऊतांनी केला.
त्याचबरोबर, एकनाथ शिंदे यांच्या घरी धार्मिक विधी करणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांचा सरकारी पाहुण्यांचा दर्जा गृह मंत्रालयाने रद्द केल्याचाही उल्लेख करत, “त्याचं उत्तर म्हस्केंनी द्यावं,” असा पलटवार केला.
संपूर्ण प्रकरणात राऊतांनी दाखवून दिलं की, आसनाची जागा ही पक्षाच्या मान-सन्मानाची मोजमाप पट्टी नसते; खरी जागा मनात असते – आणि INDIA आघाडीत उद्धव ठाकरे यांची जागा पुढेच आहे.