
मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच शासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, आता आणखी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून मंत्रालयातील अपर मुख्य सचिवांपर्यंतच्या पदांवर फेरबदल करण्यात आले असून, प्रशासनातील ही महत्त्वपूर्ण पुनर्रचना मानली जात आहे.
बदल्यांची यादी अशी :
१) अजीज शेख – व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथून आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर बदली.
२) अशीमा मित्तल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथून आता जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्त.
३) श्रीकृष्णनाथ पांचाळ – जिल्हाधिकारी, जालना येथून जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर बदली.
४) विकास खारगे – मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिवपदावरून आता अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई येथे नियुक्त.
५) अनिल डिग्गीकर – अपंग कल्याण विभागातील अपर मुख्य सचिवपदावरून आता अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई या पदावर बदली.
या बदल्यांनी राज्य प्रशासनात नवचैतन्य येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही फेरबदल सरकारच्या रणनीतीचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.