
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अटकपूर्व जामीन नाकारल्या नंतर तब्बल महिनाभरा पासून पोलिसांना गुंगारा देत असताना
कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तिकपणे कारवाई करत प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी देत शिवरायांबद्दल अवमानजनक शब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून कोल्हापूरला आणण्यात येत आहे. यापूर्वी प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तो फेटाळला आहे. या अटकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली. कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असे फडणवीस यांनी म्हटले.
कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हेच पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे. बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता, कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता.
त्यानंतर, तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही माध्यमांत झळकले होते. मात्र, प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. दरम्यान, इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.
कोरटकरला अटक करण्याची मागणीसाठी विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती.