
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे.
आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे.
येत्या गणेशोत्सवानंतरच पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरनंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.
यंदा पोलिस भरतीमध्ये एकूण १० हजार पदे भरली जाणार आहे. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती होणार आहे. ६ सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील.त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केलं आहे.
यंदा १० हजार पोलिस भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलिस भरती घेतली जाऊ शकणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे.
मागच्या वर्षी २०२४ मध्ये पोलिस भरतीच्या १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज आले होत. दरम्यान, आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे.
असे आहेत पोलीस भरतीचे निकष
पोलिस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे. जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल. जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही. या भरतीसाठी ४ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.