
बिड प्रतिनिधी
बिडमध्ये शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडचा स्वराज्यनगर भागात असलेला कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकजवळ या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. ३५ वर्षीय या शेतकऱ्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. पण आत्महत्येपूर्वी शिक्षकाने फेसबुकवर पोस्ट केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव धनंजय अभिमान नागरगोजे असे आहे. हा शिक्षक केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणी कुटुंबासोत राहत होता. धनंजय हे केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१९ मध्ये राज्य सरकारने २० टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना धनंजय यांना अनेक अडचणी आल्या.
आज सकाळी धनंजय यांनी बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण काय हे समजू शकले नाही. मात्र जनमानसात होत असलेल्या चर्चेनुसार या व्यक्तीने अनेकांचे नाव घेऊन एक फेसबुक पोस्ट केल्याचे देखील पुढे येत आहे. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शुभविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. धनंजय यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.