
ठाणे प्रतिनिधी
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण गुन्हे शाखेने कारवाई करत कल्याण डोंबिवली भिवंडी अंबरनाथ आणि बदलापूर येथे सुमारे 50 घरफोड्यामध्ये सहभागी असलेला एका कुख्यात दरोडेखोर लक्ष्मण सुरेश शिवशरण 47 याला पोलिसांनी अटक केली आहे तो अनेक घर फोड्यामध्ये सहभागी असल्याचे पोलिसात निष्पन्न झाले होते. त्यामुळे अनेक घरफोड्यांची उकल होणार आहे.
कल्याण पुणे शाखेने भिवंडी येथून शिवसरणला अटक करण्यात आली चौकशीत जनमान त्याने 50 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. सुकश मुदन्ना कोरियन 55 याला चोरीचे सोन्याचे दागिने विकल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी कोटियनलाही अटक केली आहे. 54 लाख किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
53 एकूण लाख 41 हजार रुपयांचे 667 ग्रॅम चोरीचे सोन्याचे दागिने 78 हजार 900 रुपये रोख
एकूण जप्ती 54 लाख 20 हजार रुपये
पोलीस आयुक्त अशुतोष डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांनी पार पाडली त्याचबरोबर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या प्रकरणी उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अधिकारी संतोष उगलमुगले विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने तपासा विशेष परिश्रम घेऊन आरोपीला अटक केली.