
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : गुन्हे शाखेच्या पथकाने चेंबूर पूर्व येथील वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्समधील बंद जागेत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल ३३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ३ कोटी ३१ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूम क्रमांक ३०६ व ३०७, तिसरा मजला, वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व कक्ष-८ च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) रात्री छापा टाकला.
या कारवाईत अड्डा चालक, एक कॅशिअर, सात जुगार खेळविणारे इसम व २४ खेळाडू अशा एकूण ३३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १.५ लाख रुपये रोख, तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचे जुगार साहित्य, आर्थिक व्यवहारासाठी वापरलेले पीओएस मशीन तसेच दहा हजार रुपयांचे विदेशी मद्य असा एकूण ३.३१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम २०१९ अंतर्गत कलमांन्वये कारवाई झाली आहे. पुढील तपास कक्ष-८ चे सपोनि संग्राम पाटील करीत आहेत.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त राज तिलक रौशन, विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ही कारवाई प्रपोनि काठे, पो.नि. लोणकर, मसपोनि निकम, पोउनि साबळे, पोउनि कुरेशी, पोह/पाटील, पोह/बंगाले, पोह/चौधरी, पोशि/गावडे, पोशि/उथळे, पोशि/गायकर, पोशि/रोझ, पोशि/उत्तेकर, पोशिचा/राठोड, प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि संग्राम पाटील, पोह/कांबळे, पोह/यादव, पोह/काकडे, पोह/पाटील, पोह/बाराहाते, पोह/सकट, पोशि/सटाले, पोशि/काकड, पोह/अतिग्रे, पोशि/मोरे, मपोशि/गायकवाड, पोशिचा/डवंग आदींच्या पथकाने केली.