मुंबई प्रतिनिधी
ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइस युनियनने राज्यभर विस्ताराच्या नव्या टप्प्याला सुरुवात केली असून, कामगारहिताची संघटित आणि सक्षम चळवळ उभी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विविध विमानतळांवर संघटनात्मक रचना मजबूत करत कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावी हस्तक्षेप करण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाशी संलग्न संघटनांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट एव्हिएशन युनियनकडून कामगारांच्या कल्याणासाठी ठोस निर्णय घेण्यात येत आहेत.
कामगारांमध्ये एकजूट, कामाप्रती बांधिलकी आणि कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात एकत्रित लढा या त्रिसूत्रीवर आधारित काम राज्यभर सुरू असून, विविध विमानतळांवरील संघटनात्मक यंत्रणा अधिक बळकट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महत्त्वाच्या विमानतळांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
नियुक्त्या पुढीलप्रमाणे :
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ :
संदीप भारत धवले – संयुक्त सचिव
विनोद कांबळे – उपाध्यक्ष
चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळ :
सचिन देसाई – अध्यक्ष
देवदत्त साळगावकर – उपाध्यक्ष
अभय परुळेकर – सरचिटणीस
नाशिक विमानतळ :
भाऊलाल तांबडे – अध्यक्ष
या नियुक्तीपत्रांचे वितरण उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार व शिवसेना उपनेते राजन तेली, माजी आमदार राजन साळवी, तसेच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
यावेळी सामंत यांनी संघटनेने कामगारांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करावे, कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये आणि प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी मिळावी, असे आवाहन केले.
राज्यातील सर्व विमानतळांवर संघटनेच्या माध्यमातून कामगार कल्याणाचे ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटनेची मजबुती, कामगारांची एकजूट आणि सर्वांगीण कल्याण या ध्येयाने युनियनची पुढील वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.


