डोडा (जम्मू-काश्मीर):
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह परिसरात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. खानी टॉपजवळील दुर्गम डोंगराळ रस्त्यावरून जात असलेले लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत दहा जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहेत.
#WATCH | Doda, J&K | Rescue efforts underway after an army vehicle meets with an accident at Khani Top area of Bhaderwah, resulting in injuries to Army personnel.
The injured personnel were provided first aid at the site and were later airlifted to Udhampur for specialised… https://t.co/9xdUAss5st pic.twitter.com/ALWHb3Ar2j
— ANI (@ANI) January 22, 2026
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन उंचावरील लष्करी पोस्टकडे जात असताना अपघात घडला. अरुंद, वळणावळणाच्या रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातावेळी वाहनात एकूण १७ जवान होते.
#WATCH | Delhi: Ahead of Republic Day parade 2026, Group Captain Dharmendra Singh says, "… We are showcasing Indian defence forces tableau that will convey a message at the Kartavya Path that is our theme of 'Sangram Se Rashtra Nirman tak', from war to nation building. Its… pic.twitter.com/Am34kJgMjt
— ANI (@ANI) January 22, 2026
घटनेची माहिती मिळताच लष्कराचे बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भूभागामुळे मदतकार्याला अडथळे येत असतानाही जवानांना दरीत उतरून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. जखमी जवानांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त वाहन बुलेटप्रूफ असल्याने त्याचे वजन अधिक होते. दरीची खोली आणि वाहनाचा वेग लक्षात घेता जवानांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित भागात अरुंद रस्ते, तीव्र वळणे तसेच धुके आणि निसरडी परिस्थिती कायम असते.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण लष्करात शोककळा पसरली असून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाबद्दल देशभरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.


