
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक १६ जानेवारी २०२५)—पुण्यातील चाकण-शिक्रापूर रोडवर भरधाव वेगातील एका कंटेनरनने अनेक वाहनाल धडक दिल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झालेत.
पुण्यात आजकाल अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत पुणे नगर रोडवर ( वाघोली त घटना घडल्याचे ताजे असतानाच अशातच आज पुण्यात जवळील चाकण शिक्रापूर रोडवर एक भीषण अपघाताचा थरार घडला आहे.
अधिक माहिती अशी की चाकण कडून शिक्रापूरच्या दिशेने कंटेनर वेगाने जात होते. रस्त्यावर अनेक वाहन होती मात्र येणाऱ्या घटना धडक देत पुढे चालले होते. तात्काळ चाकण शिक्रापूर वर सुरू असलेल्या थरारक अपघाताची माहिती दर्शक नागरिकांनी पोलिसांना कळवली. कंटेनर चालक काही केल्या आपले वाहन थांबत नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाटसरूंनी पोलिसांच्या या पाठलागाचा थरार आपल्या कॅमेरात कैद केला. या संबंधितांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर कंटेनर चालकाने चाकणच्या माणिक चौकात ०३ महिलांना उडवले त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाठलाग सुरू केल्यानंतर त्याने घाबरून चाकण, रासे , शेलगाव, पिंपळगाव व चौफुला परिसरात इतर काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर शिक्रापूर हद्दीत या कंटेनरला रोखण्यात यश आले. तिथे नागरिकांनी कंटेनर चालकाला चांगलाच चोप दिला.
मुलीचे पाय शरीरापासून……
सेल पिंपळगाव येथे या कंटेनर ने एक ट्रक व कारला धडक दिली. त्यात सदर कार दुसऱ्या एका ट्रक खाली शिरली. त्यानंतर या कंटेनर ने चाकण येथे एका मुलीला धडक दिली त्यात मुलीचा पाय शरीरापासून वेगळे झाला. या घटनेत कंटेनर चालकाने १० ते १५ जणांना उडवले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.