
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (१६ जानेवारी २०२५)-दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी उतरणार आहे. या निवडणुकीसाठी स्टार प्रचाराचे याद जाहीर करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी उतरणार १७ जानेवारी २०२५ पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यातच अजित पवार गटाकडून या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, ब्रिज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश आदीक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीर शर्मा, चैतन्य मानकर, वीरेंद्र सिंग, दिपाली अरोरा, यांच्यासह आणखी काही नेत्याच्या समावेश आहे.