मुंबई प्रतिनिधी
राज्यातील वाहनधारकांसाठी वाहतूक विभागाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे आता अनिवार्य असून, ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही, त्यांच्यावर थेट १० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल.
राज्यातील आकडेवारी काय सांगते?
सध्या राज्यातील सुमारे ६० टक्के वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यात आली आहे.
मुंबईत हा आकडा ६६ टक्के, तर पुण्यात सर्वाधिक आहे.
पुणे आरटीओ राज्यात क्रमांक १ ठरला आहे.
मुंबईत अंधेरी आरटीओ हद्दीत सर्वाधिक वाहनधारकांनी ही प्लेट बसवली आहे.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अजूनही हजारो वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अंतिम मुदतीनंतर अशांवर थेट दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
“वाहन सुरक्षिततेसाठी एचएसआरपी आवश्यक” वाहतूक विभाग
एचएसआरपी नंबर प्लेटमध्ये विशेष लेझर कोड आणि सुरक्षित लॉकिंग सिस्टम असते. चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहन ओळख सुलभ करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया (ऑनलाइन पद्धतीने):
1. transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. “Apply High Security Registration Plate Online” या पर्यायावर क्लिक करा.
3. “Order HSRP” निवडा.
4. आपल्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर प्रविष्ट करा.
5. आवश्यक फी ऑनलाइन भरा आणि पेमेंटची रिसीट डाउनलोड करा.
6. जवळच्या अधिकृत एजन्सीत अपॉइंटमेंट बुक करा.
7. ठरलेल्या तारखेला त्या केंद्रावर जाऊन नवीन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्या.
• उशीर म्हणजे नुकसान!
वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की
“३० नोव्हेंबरनंतर कोणतीही सवलत मिळणार नाही. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना दंड भरावा लागेल. त्यामुळे वेळेतच एचएसआरपी प्लेट बसवून घ्या.
वाहन सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एचएसआरपी प्लेट बसवणे आवश्यक आहे. थोडी काळजी घेतल्यास मोठा दंड टाळता येईल. त्यामुळे नोव्हेंबर संपण्यापूर्वीच आपल्या वाहनावर एचएसआरपी प्लेट बसवून घ्या, हीच वेळ, हीच संधी!


