मुंबई प्रतिनिधी
भारताचे महान संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (आठवले) पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता ऐतिहासिक भूमी महाड क्रांतीभूमी, चवधे मैदान, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमित जनार्दन तांबे (अध्यक्ष, उत्तर-मध्य मुंबई जिल्हा) तसेच सिद्धार्थ कासारे (मुंबई प्रदेशाध्यक्ष – रिपाई) यांच्या नेतृत्वाखाली विशेष तयारी सुरू आहे.
या सोहळ्याला रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे विविध विभाग प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
रिपब्लिकन पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी “चला महाड” हा प्रेरणादायी नारा देण्यात आला असून, महाड क्रांतीभूमीवर ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.
स्थळ: ऐतिहासिक भूमी महाड क्रांतीभूमी, चवधे मैदान, जिल्हा रायगड
वेळ: दुपारी ३.०० वा.
दिनांक: सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५
मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा दीप पुढे प्रज्वलित करा!असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


