
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
मकर संक्रात सण जवळ आला की नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात. आणि नायलॉन मांजा चा वापर करतात .परिणामी दरवर्षी, तो नागरिकांसाठी अपघाताची आणि हजारो पक्षासाठी मृत्यूचे कारण ठरतो.
पतंगबाजी साठी वापरण्यात येणाऱरा नायलॉन मांजा अतिशय घातक ठरत असून, दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुचाकी स्वरांचे अपघात होतात. कुणाचा हात कापला जातो तर कुणाचा गळा चिरून गंभीर जखमी होते . रस्त्यावर कुठेही नायलॉन म्हणजे अडकलेला असू त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालवताना दक्षता घेणे गरजेचे आहे
पतंग उंच उडवा आणि पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत नायलॉन किंवा चायनीज सिंथेटिक मांजाचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेने परिसरात प्रबोधन फेरीचे आयोजन करून प्रतिकात्मक मांजाची सार्वजनिक होळी केली. मकर संक्रांत सहन जवळ आला की नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात.. हा पतंग उंच उडावा यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो.
पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत कापलेला मांजा विजेचे खांब, इमारतीचे रेलिंग, किंवा झाडांमध्ये अडकतो. परिणामी दरवर्षी तो नागरिकांसाठी अपघाताची आणि हजारो पक्षासाठी मृत्यूचे कारण ठरतो. त्यामुळे नायलॉन, काच, धातूचा चुरा, आणि विविध रसायने लावलेला धोकादायक मांजा वापरू नये असे आव्हान करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) स्काऊट गाईडच्या दीडशेहून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, प्रवीण रांगोळे, हनुमंत तोडकर, विकास पढेर, पूनम पाटील यांनी संयोजन केले.