
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व: गुरुवारी सकाळी वांद्रे पूर्व येथील अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर आणि नागरी आरोग्य केंद्राच्या गेटसमोर पानदिवड जातीचा बिनविषारी साप दिसल्याने रुग्ण आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी रोशन शिंदे आणि मुंबई रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स घटनास्थळी दाखल झाले. हॉस्पिटल परिसरात रुग्णांची गर्दी असतानाच साप दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
वापरा संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे आणि माहीम पोलिस वसाहत येथील सर्पमित्र सचिन मोरे यांनी सापची काळजीपूर्वक पाहणी करून रेस्क्यू केले. साप एका लादीखाली दडलेला होता, मात्र त्याला कोणतीही इजा झाली नव्हती, असे सर्पमित्र अतुल कांबळे यांनी सांगितले.
रेस्क्यू नंतर सर्पमित्रांनी नागरिकांना सापाबद्दल माहिती दिली आणि घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे समजावले. वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले.
हॉस्पिटल परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांची आणि वन विभागाची तत्परता कौतुक केले.