
मुंबई प्रतिनिधी
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या वर्षीची दिवाळी आणखी गोड ठरणार आहे. दीपावली २०२५ च्या निमित्ताने सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा बीएमसी प्रशासनाने केली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या अनुदानाचा निर्णय जाहीर केला. बीएमसीच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, यात शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षण सेवक, तसेच शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांचाही समावेश आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे
• महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी: ३१,०००
• अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी: ३१,०००
• महानगरपालिका व खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षण सेवक: ३१,०००
• माध्यमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित): ३१,०००
• माध्यमिक शाळांतील शिक्षण सेवक (अनुदानित व विनाअनुदानित): ३१,०००
• अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित): ३१,०००
• अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवक (पूर्णवेळ): ₹३१,०००
• याशिवाय, सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून ₹१४,०००, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ₹५,००० इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे बीएमसीच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या घरात या दिवाळीत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.