
सातारा प्रतिनिधी
सातारा|पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत सातारा जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव मंडळाकडून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेच्या परिसरात विविध प्रजातींची झाडे लावून हिरवाई वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) राहुल देसाई, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे, कार्यकारी अभियंता (बांधकाम उत्तर विभाग) मोहसिन मोदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) संदीप भिंगारे, लेखाधिकारी (अर्थ विभाग) योगेश कारंजकर, उपअभियंता (बांधकाम उपविभाग) माधव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, वृक्षारोपण हे जिल्हा परिषदेच्या पूर्वेकडील बराच काळ कचऱ्याने भरलेल्या जागेची स्वच्छता करून करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसराला नवचैतन्य लाभले असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश जिल्हा परिषदेने दिला आहे.