
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
गोंडा (उत्तर प्रदेश) – गोंडा जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास सरयू कालव्यात बोलेरो कार कोसळून एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.
SUV with 15 pilgrims overturned in canal near Itiyathok in Gonda district. 11 dead, 4 rescued.#UttarPradesh #RoadAccident pic.twitter.com/hCCw4DVg1r
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) August 3, 2025
घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो कारमध्ये एकाच कुटुंबातील 13 जण बसले होते. हे सर्वजण गोंड्यातील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी निघाले होते. मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिहागाव-खरगुपूर मार्गावर अपघात झाला.
पावसामुळे रस्ता निसरडा
स्थानिकांच्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे कालव्याजवळील रस्ता ओला व निसरडा झाला होता. बोलेरोचा वेग जास्त असल्याने ती घसरून सरयू कालव्यात कोसळली. वाहन पाण्यात गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
मृतांची नावे
या दुर्घटनेत बीना (३५), काजल (२२), मेहक (१२), दुर्गेश, नंदिनी, अंकित, शुभ, संजू वर्मा, अंजू, अनसुइया आणि सौम्या यांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची शोकसंवेदना व मदत जाहीर
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत.