
पुणे-प्रतिनिधी
पुणे सुनील कलशेट्टी (दि. १७)– परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर घडलेल्या घटने संदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली.रविवारी यातील सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा पोलीस कोठडी दुर्दैवी मृत्यू झाला.सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कॉम्बिंग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांची निलंबन करा,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सदर प्रकरणांची सीबीआय चौकशी करा आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.राज्य संघटक सचिव रिपाई (आठवले गट) श्री परशुराम वाडेकर म्हणाले, परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमना सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केले ते केवळ दलित व बौद्ध वस्ती असलेल्या ठिकाणी ठरवून केलेले आहे. जय भीम लिहिलं गाड्या पोलिसांनी फोडले लोकांना पोलिसांनी रुग्णालयात न नेता पोलिसांना दाबून लोकांना पोलिसांनी रुग्णालयात न नेता पोलिसांना दाबून ठेवले. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने न होता पोलिसांच्या अमानुष्य महाराणी मुळे पोलीस कुठेच झाला. मात्र सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या हिवाळी अधिन सुरू आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे सांगावे. तसेच अशाप्रकारे कायदे हातात घेणाऱ्या पोलिसावर कारवाई व्हावी. सदर प्रकाराची शिवाय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन सुरू करू असा इशारा वाडेकर यांनी दिला.यावेळी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी महापौर सुनिता वाडेकर,माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, संगीता आठवले, विशाल शेवाळे, माजी नगरसेविका हिमालय कांबळे, बसवराज गायकवाड, श्याम सदाफुले, राहुल डंबाळे बापूसाहेब भोसले, यशवंत नडगम मीना माल, चांदणी गायकवाड आदी रिपाई (आ) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दि. १७ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध संघटनांच्या वतीने जोरदार घोषणेबाजी करीत विविध मागण्यांचे निवेदन लोणी काळभोर पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांना देण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवकांचे सचिव रिपाई (आ) दीपक आढाळे, बहुजन दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन जगताप,वंचित बहुजन आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष केतन निकाळजे, रमेश गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, अँड बाळासाहेब दाभाडे,ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, नितीन लोखंडे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे राकेश लोंढे, केतन निकाळजे, करण खंडागळे, विशाल शेलार, अमोल टेकाळे, तानाजी तापकिरे,अभिजीत पाचकुडवे, संजय गायकवाड, व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.