
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज येथील मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले. संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरिता अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन करणे आवश्यक आहे, हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे आयोजन केले पाहिजे, याकरिता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिली.नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज येथील मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे, म्हणाले ग्रंथाचे महत्त्व चिरकाल आहे, आपली ग्रंथसंपदा ज्ञान किती थोर आहे हे सहाव्या शतकातील नालंदा विश्वविद्यालयाच्या ग्रंथसंपदेतून दिसून येते. त्याकाळी नालंदा विद्यालयात सर्व विद्या शाखांचा अभ्यास करण्यात येत असे. बख्तियार खिलजी याने नालंदा विश्वविद्यालयावर हल्ला केला आणि तेथील ग्रंथसंपदेला आग लावली. ती आग तीन महिने जळत होते.
ग्रंथाची आपले नाते खूप जुने असून ते चिरकाल टिकले आहे. भारतीय सभ्यता जगातल्या सर्वात जुन्या सभ्यतेपैकी आहे.जगातील इतर अभ्यास संपल्या असल्या तरीही भारतीय सभ्यता चिरंतर चालू आहे. सर्व दिशांनी येणारे ज्ञान ग्रहण केले पाहिजे अशी शिकवण आपल्या सभ्यतेने दिली आहे. म्हणूनच ग्रंथाशी आपले अतूट नाते राहिले आहे डिजिटल युगातील आपले ग्रंथ आणि विचार टिकून राहणार आहेत. आपली ग्रंथसंपदा आणि विचार कधी संपू शकत नाही. कोणत्याही पुस्तकात तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध भाषांमध्ये सहज वाचते येणे शक्य झाले आहे.तंत्रज्ञानाने ज्ञानाची दारे उघडली गेली आहेत. आपली वाचन संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केली पाहिजे. वैश्विक असलेली मराठी भाषा अभिजात भाषा झाली असून मराठी भाषेला राज्य मान्यता मिळाली आहे.त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे.
आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे, असे आव्हान श्री फडणीस यांनी केले पुस्तक प्रदर्शनानिमित्त लावण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि प्रकाश मुद्रांक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.यावेळी लेखिका अरुण ढेरे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, करले राज मलिक यांनी आपले विचार व्यक्त केले. पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी कार्यक्रमाचे पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रास्तविक केले.मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थित पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नॅशनल बुक ट्रस्टच्या पुणे कार्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या बाबतचे पत्र हस्तांतर करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार चंद्रकांत दादा पाटील, आ.माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. अमित गोरखे, आ. हेमंत रासने आ. शंकर जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू सुरेश गोसावी,सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आचार्य पवन त्रिपाठी, साहित्यप्रेमी नागरिक, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रकाश मुद्रक उपस्थित होते.