पालघर Archives - Satara Pratinidhi

कोयत्याच्या वारानंतर तीन महिन्यांनी महसूल अधिकारी स्नेहल सावंत यांचा मृत्यू
पालघर प्रतिनिधी

पालघर : प्रेमप्रकरणातून झालेल्या कोयत्याच्या प्राणघातक हल्ल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या २४ वर्षीय महसूल अधिकारी स्नेहल सावंत यांचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

स्नेहल सावंत या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात त्यांचा बॉयफ्रेंड अमोल मुळे याने त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात स्नेहल यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

हल्ल्यानंतर स्नेहल यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे सुमारे तीन आठवडे उपचार घेतल्यानंतर गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर सातारा येथील पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, हल्ल्यानंतर पसार झालेल्या अमोल मुळे याचा पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने शोध घेत त्याला अटक केली होती. स्नेहल सावंत यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आता हत्येचे स्वरूप आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

The post कोयत्याच्या वारानंतर तीन महिन्यांनी महसूल अधिकारी स्नेहल सावंत यांचा मृत्यू appeared first on Satara Pratinidhi.

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला; १२ चिता पेटताच बापूगाव ढसाढसा रडलं
पालघर प्रतिनिधी

लग्नसराईच्या उत्साहात निघालेलं वऱ्हाड काही तासांतच मृत्यूच्या दरीत कोसळलं आणि संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ जणांच्या पार्थिवांवर आज डहाणू तालुक्यातील बापूगाव येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र अंत्यसंस्कार होत असल्याने संपूर्ण परिसर हळहळला. महिलांचा आक्रोश, नातेवाईकांचा हंबरडा आणि डोळ्यांत अश्रू घेऊन उभे असलेले गावकरी हे दृश्य प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणारं होतं.

सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १२ जणांची पार्थिवं आज सकाळी बापूगावात आणण्यात आली. लखनपाडा परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या पार्थिवांवर अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. “कालपर्यंत साखरपुड्याच्या तयारीत असलेले हे चेहरे आज कायमचे शांत झाले,” अशी भावना व्यक्त करत अनेक गावकरी अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.

आनंदाच्या प्रवासावर मृत्यूची सावली

डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड धानिवरी येथे साखरपुड्यासाठी निघाले होते. टेम्पोमध्ये नातेवाईक, महिला आणि लहान मुलांसह गावकरी मोठ्या उत्साहात प्रवास करत होते. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. महामार्गावर एक किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी चालकाने आऊटसाईडने टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गुजरातहून मुंबईकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने प्रथम एका दुचाकीस्वाराला चिरडलं आणि त्यानंतर नियंत्रण सुटून थेट वऱ्हाडाच्या टेम्पोवर पलटी झाला.

क्षणात टेम्पोचा चक्काचूर झाला. कंटेनरखाली दबून अनेक जण जागीच ठार झाले. अपघातानंतर महामार्गावर किंकाळ्या, रक्ताचे डाग आणि मदतीसाठी धावणाऱ्या नागरिकांची धावपळ पाहून परिसर हादरून गेला.

१२ जणांचा जागीच मृत्यू; २५ हून अधिक जखमी

या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर डहाणू आणि परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली. धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात १७ जखमींवर उपचार सुरू असून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

एकाच वेळी १२ चिता पेटल्या… गाव ढसाढसा रडलं

दुपारच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत १२ पार्थिवांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकामागोमाग एक चिता पेटत असताना संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते, तर काही वृद्ध नातेवाईकांना धीर देण्यासाठी ग्रामस्थांना पुढे यावं लागलं. “असा दिवस गावावर कधीच आला नव्हता,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. अनेकांच्या हातात मृतांच्या छायाचित्रांसह पुष्पहार दिसत होते. तरुणांच्या अकाली मृत्यूने गावातील वातावरण भारावून गेलं.

सरकारकडून मदतीची घोषणा

या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, स्थानिक खासदार तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जखमींना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री उईके यांनी दिली. “आदिवासी विकास विभाग जखमींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. रुग्णालय ते गाव प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि उपचारांची जबाबदारी सरकार घेणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गावात सणाऐवजी शोक

ज्या घरांत साखरपुड्याची तयारी सुरू होती, तिथे आता शोककळा पसरली आहे. कालपर्यंत वाजणारे ढोल-ताशे आणि लग्नगीतांच्या जागी आज रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने बापूगाव अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही.

The post साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला; १२ चिता पेटताच बापूगाव ढसाढसा रडलं appeared first on Satara Pratinidhi.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची वऱ्हाडाच्या ट्रकला धडक, १३ ठार
पालघर प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सोमवारी दुपारी रक्ताने माखला. लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील धानीवरी गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. रस्त्यावर विखुरलेले मृतदेह, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी आणि भर उन्हात नातेवाइकांचा आक्रोश यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलल्याने पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

धडक इतकी भीषण की ट्रक पलटी

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे शंभर वऱ्हाडी मंडळी आयशर ट्रकमधून लग्नासाठी जात होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानीवरी गावाजवळ पोहोचताच समोरील भरधाव कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. अपघातानंतर ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला. अनेक प्रवासी ट्रकखाली दबले गेले, तर काही जण वाहनाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये अडकून पडले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर काही क्षण संपूर्ण परिसरात किंकाळ्या आणि मदतीसाठी आर्त हाका घुमत होत्या. जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले.

ग्रामस्थांचे धाडस; प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. ट्रकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांत हलवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या माणसांचा शोध घेताना अनेकांचा बांध फुटला. रुग्णालयातही हंबरडा आणि आक्रोशाचे वातावरण पाहायला मिळाले.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती

प्राथमिक तपासात वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. अतिवेग, चालकाचे दुर्लक्ष अथवा तांत्रिक बिघाड यांपैकी नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि जीव धोक्यात घालून होणारी वाहतूक यावर आता कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “पालघरच्या धानीवरी येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींवर सर्वोत्तम उपचार सुरू असून प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे,” असे त्यांनी म्हटले.

तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

The post मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची वऱ्हाडाच्या ट्रकला धडक, १३ ठार appeared first on Satara Pratinidhi.

महिला सरपंचाला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघर एसीबीची कारवाई
पालघर प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संध्या संजय पागधरे (वय ४७) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई १३ मे रोजी करण्यात आली.

तक्रारदार हे स्वतःचा डाय-मेकिंग (औद्योगिक कटिंग) व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बँकेत कर्जप्रकरण दाखल करीत होते. कर्ज प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. याच NOC साठी सरपंचांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबी पालघर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ग्रामपंचायत सामान्य पावतीसाठी २ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये अशी मागणी निश्चित करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

यानंतर सापळा रचून एसीबीच्या पथकाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंचांना पकडले. ही कारवाई तारापूर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आली.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालघर एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

The post महिला सरपंचाला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघर एसीबीची कारवाई appeared first on Satara Pratinidhi.

पोलिसांना घाबरून पळाले आणि ट्रॅकवर गेले; समोरून आलेल्या मालगाडीने उडवले – पालघरमध्ये तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर प्रतिनिधी

रेल्वे रुळांवरून जात असताना किंवा रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात होणाऱ्या अपघातांच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत असतानाच पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांच्या भीतीने पळत सुटलेल्या तीन तरुणांना समोरून येणाऱ्या मालगाडीची धडक बसल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पूर्वेकडील जुना पालघर परिसरातील जैन मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे असून तिघेही स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

स्थानिक परिसरात पोलिसांची कारवाई सुरू असताना काही तरुणांनी तेथून पळ काढल्याचे सांगितले जाते. याच दरम्यान स्वप्निल, कुणाल आणि अफरोज हे तिघेही पोलिसांच्या भीतीने धावत धावत रेल्वे रुळांच्या दिशेने गेले. मात्र घाईगडबडीत त्यांना समोरून वेगाने येणाऱ्या मालगाडीचा अंदाज आला नाही.

काही क्षणांतच मालगाडीने तिघांनाही जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

नातेवाईकांचे गंभीर आरोप

या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या भीतीनेच हे तरुण पळत सुटले आणि त्यामुळेच ते रेल्वे रुळांवर गेले, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

परिसरात हळहळ

घटनेची माहिती समोर येताच परिसरात मोठी गर्दी झाली. तरुणांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा नेमका तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे सांगण्यात आले.

The post पोलिसांना घाबरून पळाले आणि ट्रॅकवर गेले; समोरून आलेल्या मालगाडीने उडवले – पालघरमध्ये तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Satara Pratinidhi.

पालघरमध्ये प्रकल्पविरोधी एल्गार; ४० हजार नागरिक रस्त्यावर
पालघर प्रतिनिधी

वाढवण बंदर, ‘चौथी मुंबई’, प्रस्तावित औद्योगिक व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील आदिवासी, मच्छीमार आणि स्थानिक व्यवसायांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करत सोमवारी पालघर जिल्ह्यात अभूतपूर्व जनआंदोलन झाले. विविध संघटनांच्या हाकेला प्रतिसाद देत सुमारे ४० हजार नागरिक रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य आक्रोश मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला, तर संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वाढवण-मुरबे येथील बंदर, वस्त्रोद्योग प्रकल्प, समुद्रातील विमानतळ, ‘चौथी मुंबई’ आणि इतर राष्ट्रीय प्रकल्पांना विरोध करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षातर्फे चारोटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी प्रश्नांवर लॉन्ग मार्चही आयोजित करण्यात आला.

अस्तित्वाचा लढा

जिल्हा निर्मितीनंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चात महिलांचा आणि मच्छीमार गावांतील नागरिकांचा मोठा सहभाग होता. ‘हा लढा केवळ जमिनीचा नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा आणि समुद्रावरील हक्काचा आहे,’ अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

सकाळी ११ वाजता पालघर ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ येथून मुख्य मोर्चा निघून हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत रेल्वे स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. कष्टकरी संघटना, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, प्रहार संघटना आदी संस्थांचे पदाधिकारी, आदिवासी नेते आणि स्थानिक राजकीय पुढारी मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ३५ हून अधिक वक्त्यांनी प्रकल्पांमुळे विकासाऐवजी पर्यावरणीय व सामाजिक विनाश होणार असल्याचा आरोप केला. त्यानंतर काही संघटनांनी आंदोलन स्थगित केले, मात्र कष्टकरी संघटनेने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला.

प्रमुख मागण्या

• वाढवण बंदर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा; या प्रकल्पामुळे २० हजारांहून अधिक मच्छिमारांची उपजीविका आणि ५ हजारांहून अधिक घरे बाधित होणार आहेत.

• ‘चौथी मुंबई’ प्रकल्पामुळे डहाणू व तलासरीतील ११० आदिवासी गावांचे अस्तित्व धोक्यात येणार असून ‘पेसा’ कायद्यांतर्गत अधिकारांवर गदा येईल.

• गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क दावे तातडीने मंजूर करावेत.

• डहाणू थर्मल पॉवर, प्रस्तावित सिमेंट प्रकल्प व खाडी खाजगीकरणाद्वारे स्थानिकांना विस्थापित करण्याचे प्रयत्न थांबवावेत.

निसर्ग आणि उपजीविकेवर परिणाम

वाढवण बंदरासाठी ७ कोटी टन दगड व २० कोटी घनमीटर वाळू वापरली जाणार असल्याने डोंगर, जलस्रोत आणि किनारी परिसंस्था नष्ट होतील, असा इशारा आंदोलकांनी दिला. समृद्धी महामार्ग विस्तार, नवीन रेल्वे प्रकल्प व विमानतळामुळे सुमारे ४९ हजार नागरिक विस्थापित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

कडेकोट बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १५०० ते १७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही मार्ग बंद केल्याने नागरिकांना अर्धा किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. सुरक्षेच्या कारणास्तव दुकाने बंद ठेवण्यात आली, तर काही शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी काळ्या टोप्या व काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. अखेरीस संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना निवेदन देण्यात आले. त्यात पर्यावरण संरक्षण आदेशांचे उल्लंघन, उपजीविकेच्या अधिकारावर घाला आणि सामाजिक-पर्यावरणीय मूल्यांकनातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

The post पालघरमध्ये प्रकल्पविरोधी एल्गार; ४० हजार नागरिक रस्त्यावर appeared first on Satara Pratinidhi.

पालघरमध्ये प्रकल्पांविरुद्ध एल्गार; आज ‘आक्रोश मोर्चा’, २० रोजी माकपचा ‘लाँग मार्च’
पालघर प्रतिनिधी

वाढवण बंदर, ‘चौथी मुंबई’ आणि जिंदाल बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी पण विनाशकारी ठरणाऱ्या प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याचा आरोप करत शेतकरी, आदिवासी आणि मच्छीमार संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (१९ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो नागरिकांचा ‘आक्रोश मोर्चा’ धडकणार असून, यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेचा ‘लाँग मार्च’ २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या कार्यालयापासून मुख्य मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा हुतात्मा स्मारक, रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी संघटना व माकपचा ‘लाँग मार्च’ही १९ जानेवारीला सुरू होणार असून, तो २० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी कष्टकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा संघटनेचे नेते ब्रायन लोबो यांनी दिला आहे.

या आंदोलनात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, प्रहार संघटना यांसह अनेक स्थानिक संघटना सहभागी होणार आहेत. हा संघर्ष केवळ जमिनीच्या मोबदल्यापुरता मर्यादित नसून, पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा, उपजीविकेचा आणि समुद्रावरील हक्कांचा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विरोधाची प्रमुख कारणे

वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे २० हजारांहून अधिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असून, पाच हजारांपेक्षा अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘चौथी मुंबई’ प्रकल्पामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सुमारे ११० आदिवासी गावांचे अस्तित्व धोक्यात येणार असून, ‘पेसा’ कायद्यांतर्गत मिळणारे आदिवासींचे हक्क हिरावले जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले हजारो आदिवासींचे वनहक्क दावे तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अदानी समूहाशी संबंधित डहाणू थर्मल पॉवर प्रकल्प, प्रस्तावित सिमेंट प्रकल्प आणि खाड्यांचे खाजगीकरण करून स्थानिकांना विस्थापित करण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

पर्यावरण आणि उपजीविकेवर संकट

वाढवण बंदराच्या भरावासाठी सुमारे सात कोटी टन दगड आणि वीस कोटी घनमीटर वाळू वापरली जाणार असून, त्यामुळे नानीवली, महागाव, गारगाव यांसारख्या गावांतील डोंगर, जलस्रोत आणि जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार, नवीन रेल्वे प्रकल्प आणि प्रस्तावित विमानतळ यांमुळे सुमारे ४९ हजारांहून अधिक लोकसंख्या विस्थापित होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये उभा राहत असलेला हा जनआक्रोश येत्या काळात राज्य सरकारसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.

The post पालघरमध्ये प्रकल्पांविरुद्ध एल्गार; आज ‘आक्रोश मोर्चा’, २० रोजी माकपचा ‘लाँग मार्च’ appeared first on Satara Pratinidhi.

पुरोगामी महाराष्ट्राला कलंक ‘कोवळ्या मुलींच्या विक्री’चा काळा बाजार पालघर जिल्ह्यात..
पालघर प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा वारंवार गर्वाने उल्लेख होत असतानाच, त्याच भूमीत एका भयावह वास्तवाने समाजमनाला जबर धक्का दिला आहे. शाहू, फुले आणि आंबेडकरांनी घडवलेल्या प्रगत महाराष्ट्राच्या पायाशीच पुन्हा एकदा सरंजामशाहीची सावली दाटून आली आहे. आदिवासी भागात अल्पवयीन मुलींची पैशांत विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवर ‘लग्न’ या नावाखाली सुरु असलेल्या या कोवळ्या मुलींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराने मानवी संवेदनांचा पूर्ण विसर पडल्याचे चित्र समोर येत आहे. १४-१५ वर्षांच्या मुलींना अवघ्या ४० ते ५० हजारांत विकत घेतल्याचे समोर आले आहे. यापैकी काही प्रकरणांत ७०-८० हजारांपर्यंत सौदा होत असल्याचेही माहितीचक्रात आहे.

लग्नासाठी मुली मिळत नाहीत… आणि सुरू झाला सौद्यांचा धंदा

वाढत्या हुंडाबळामुळे, शिक्षणाच्या अपेक्षांमुळे आणि नोकरीला महत्त्व मिळू लागल्याने काही तरुणांचे विवाह ठरत नाहीत. हीच मागणी-पुरवठ्याची दरी पाहून काही दलाल सक्रिय झाले. हे एजंट नवरदेवाकडून लाखो रुपये घेतात आणि आदिवासी भागातील निरक्षर, अत्यंत गरीब कुटुंबांना काही हजारांची आमिषे दाखवून मुलींचा सौदा करतात.

‘सुखात संसार होईल’, ‘मुलगा चांगल्या नोकरीत आहे’… अशा गोड बोलांनी फसवले गेलेले पालक आपल्या मुलींच्या भवितव्याचा चक्क व्यापार होत असल्याची कल्पनाही करू शकत नाहीत.

झोपडी ते नरकयात्रा : १५ वर्षांच्या पीडितेची हृदयद्रावक कहाणी

गवताच्या भिंती, गवताचेच छप्पर… इतक्या दारिद्र्यात वाढलेली ही मुलगी. आई-वडील वीटभट्ट्यांवर मजुरीला आणि तिला प्रामुख्याने आजीकडेच वाढवले गेले.

एका दिवशी गावातील कोर नावाच्या दलालाने आजीशी काहीतरी संगनमत केले. नंतर आजीचे निधन झाले आणि या गोंधळातच मुलीला थेट संगमनेरला नेण्यात आले. अवघ्या ५० हजारांत तिचा सौदा झाला होता.

‘थोड्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे’, असे सांगून एका क्षणात तिच्या हातात मंगळसूत्र टाकण्यात आले… आयुष्यभराचं ओझं!

ती मुलगी आज १५ वर्षांची असून, तिच्या हातात दोन वर्षांचे बाळ आहे. या तीन वर्षांत तिने भोगलेल्या अमानुष अत्याचारांची वेदना तिच्या चेहऱ्यावर शब्दांशिवाय उमटते.

दुसरी कहाणी : गर्भपात करून माहेरी हाकलले

जव्हारमधील १४ वर्षीय नीलम हिचाही याच पद्धतीने जळगावातील तरुणाशी ‘लग्न’ लावण्यात आले. लग्नानंतर ती गरोदर राहिली. पण तिच्या सासरच्यांनी जबरदस्ती गर्भपात करून तिला माहेरी परत पाठवले.

एजंटांचे पैसे मिळाल्यावर या मुलींचे नशिब धुळीस मिळत असल्याचे हे आणखी एक उदाहरण.

पालकांची असहायता आणि दलालांची दंडेलशाही

अत्यंत गरीब कुटुंबांना ४०-५० हजारांची रक्कम भविष्यातील संकटावरचा उपाय वाटतो. पण ते आपल्या चिमुकलींच्या आयुष्याचा ‘काळा करार’ ठरतो, याची त्यांना कल्पना नसते.

या मुली कोणाला दिल्या जात आहेत? कुठे राहतील? कोणत्या परिस्थितीत? काहीच माहित नसताना दिलेला ‘होकार’ आयुष्यभराची कैद बनतो.

पोलीस हालचाली – आरोपी आणि दलाल बेड्या

वाडा व जव्हार तालुक्यातील उघडकीस आलेल्या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित दलालांसह आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

परंतु, अशा अनेक मुलींच्या व्यथा अद्यापही दडल्या आहेत, हेही तितकेच सत्य.

पुरोगामी महाराष्ट्राच्या अंतःकरणाला प्रश्न

अशा घटना समोर येणे म्हणजे समाजातील असमानतेची खोल दरी उघड करण्यासारखे आहे.

गरीबी, निरक्षरता, फसवणूक आणि लिंगभेद यांचा काळा संगम आजही निर्धाराने उभा आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात कोवळ्या मुलींची विक्री, हा केवळ गुन्हा नाही… तर आपल्या सामूहिक संवेदनांना बसलेला जबर धक्का आहे.

The post पुरोगामी महाराष्ट्राला कलंक ‘कोवळ्या मुलींच्या विक्री’चा काळा बाजार पालघर जिल्ह्यात.. appeared first on Satara Pratinidhi.

बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सार्वजिनक बांधकाम विभागाचे 111.65 कोटी रुपये लाटण्याचा प्लॅन फसला, पालघरमध्ये खळबळ
पालघर प्रतिनिधी

लघरमधून मोठी बातमी समोर आली आहे, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तब्बल 111. 65 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामं केली जातात.

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जणू भस्म्या झाला की काय अशी चक्रावून टाकणारी प्रकरणं बाहेर येतायत. राज्यात कंत्राटदांचे तब्बल 90 हजार कोटींची बिल थकीत असल्याने कंत्राटदार आत्महत्या करतायत, नवीन कामं करण्यास कुणी धजावत नाही. पण जव्हार (जि. पालघर) तालुक्यातील सार्वजनिक… pic.twitter.com/zzXkZYKVq3

— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 27, 2025

हे काम ज्या ठेकेदाराला दिलं जातं, तेव्हा त्या ठेकेदाराकडून अनामत रक्कम जमा करून घेतली जाते, ही अनामत रक्कम कामाच्या स्वरुपावर अवलंबून असते, म्हणजे ही रक्कम कामाच्या एकूण बजेटच्या दोन ते तीन टक्क्यांपर्यंत असते, काही कामांमध्ये ती पाच टक्के एवढी देखील असू शकते.

ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जव्हार शाखेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे खातं आहे, त्यामध्ये जमा करण्यात येते. मात्र काम झाल्यानंतर अनेक कारणांमुळे ठेकेदार ही रक्कम पुन्हा परत घेत नाहीत, त्यामुळे ही रक्कम या खात्यामध्ये तशीच राहाते, या बदल्यात मोठ्या प्रमाणात व्याज देखील मिळतं, दरम्यान ठेकेदारांची अनामत रक्कम जमा असलेल्या खात्यामधून तब्बल 111. 65 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने चेक व आवश्यक स्लिप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जमा केली. मात्र रक्कम मोठी असल्यानं बँक कर्मचाऱ्याला संशय आला आणि या खात्यामधून 111. 65 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला आहे. दरम्यान प्रकरण समोर येताच आता या प्रकरणात बांधकाम विभागानं अंतर्गत चौकशी सुरू केली असून, यामध्ये विभागातीलच काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ठेकेदारांची अनामत रक्कम असलेल्या खात्यामधून तब्बल 111. 65 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने चेक व आवश्यक स्लिप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जमा केली. मात्र रक्कम मोठी असल्यानं संबंधित बँक अधिकाऱ्याला संशय आला आणि खात्री करण्यासाठी तसेच सहीची पडताळनी करण्यासाठी तो थेट बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचला, दरम्यान तिथे गेल्यानंतर आपण असा कोणताही चेक दिला नसल्याचं संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितल्यामुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

‘राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जणू भस्म्या झाला की काय अशी चक्रावून टाकणारी प्रकरणं बाहेर येतायत. राज्यात कंत्राटदांचे तब्बल 90 हजार कोटींची बिल थकीत असल्याने कंत्राटदार आत्महत्या करतायत, नवीन कामं करण्यास कुणी धजावत नाही. पण जव्हार (जि. पालघर) तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांच्या बँकेत जमा असलेल्या अनामत रकमेपैकी तब्बल १११ कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्यातीलच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच केला. बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा मोठा दरोडा वाचला, हे नशीब म्हणावं लागेल. पण यावरुन सरकारचा प्रशासनावर काही वचक, धाक, भीती आहे की नाही असा प्रश्न पडतो. प्रशासनातील अधिकारी राजरोसपणे असे ‘बिग शॉट’ मारत असतील तर देवाभाऊ अधिकाऱ्यांना तुमची भिती उरली नाही का? या सरकारी कार्यालयात बसलेल्या या दरोडेखोरांवर दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा सरकारचीच याला मूक संमती आहे, असं आम्ही म्हणू! असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.’

दरम्यान आता या प्रकरणावरून रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

The post बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सार्वजिनक बांधकाम विभागाचे 111.65 कोटी रुपये लाटण्याचा प्लॅन फसला, पालघरमध्ये खळबळ appeared first on Satara Pratinidhi.

“इथे ओशाळली माणूसकी” बाळंतीणेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले,मोखाड्यात प्रशासनाचा भोंगळ कारभाराचे भयाण उदारण
पालघर प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्यसेवेच्या बळकट दाव्यांना काळीमा फासणारी अंगावर काटा आणणारी घटना उघड झाली आहे. प्रसूतीनंतर घरी जात असलेल्या आदिवासी बाळबाळंतनीला रुग्णवाहीकेने अर्ध्या रस्त्यात सोडून देण्याचा अमानुष प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मोखाडा व सभोवतालच्या पाड्यांमध्ये जीवनाची प्राथमिक साधनंही दुरावलेली. आरोग्य सुविधा तर क्वचितच पोहोचतात. आणि अशा परिस्थितीत सर्वांत असुरक्षित असलेल्या गरोदर व प्रसूत महिलांवर आरोग्यव्यवस्थेची उदासीनता कशी कोसळते याचे हे भयावह उदाहरण.

आमले या अतिदुर्गम गावातील सविता बांबरे यांना 19 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आणि प्रसूती सुरळीत पार पडल्याने पुढील उपचारासाठी बाळासह जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलला रेफर करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यावर हॉस्पिटलकडून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहीकेतून सविता आणि नवजात बालकाला घरी सोडले जाणार होते.

परंतु यानंतर जे घडले, ते आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशून्यतेचे काळेकुट्ट चित्र उभे करते. रुग्णवाहीका चालकाने सुरुवातीपासूनच आडमुठेपणा करत सूर्यमाळ घाटातच बाळबाळंतनीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न केला. विनवण्या करूनही त्याने त्यांच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करत अखेर आमला फाट, म्हणजेच गावापासून तब्बल दोन किलोमीटर मागे, येथे त्यांना उतरवून रुग्णवाहीका घेऊन जव्हारकडे निघून गेला.

प्रसूतीनंतर काही तासांतच नवजात बाळाला छातीशी धरून, अनवाणी पायाने ओल्या उतारावरून दोन किलोमीटर चालण्याची वेळ या आदिवासी महिलेला आली. जीवावर बेतू शकणाऱ्या या निष्काळजीपणाने स्थानिक आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

“रुग्णवाहीका चालकाला कितीही विनंती केली तरी त्याने ऐकलेच नाही. बाळबाळंतनीला अशा अवस्थेत रस्त्यात सोडणे म्हणजे थेट जीव घेण्यासारखे आहे. सवितेला काही झाले असते तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल सविताच्या पतीने उपस्थित केला.

या अमानुष प्रकारानंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांत मोठी नाराजी व्यक्त होत असून संबंधित चालकासह आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आदिवासी भागातील आरोग्यसेवा, रुग्णवाहिका व्यवस्थापन, आणि देखरेख यंत्रणेचे अपयश पुन्हा एकदा निर्वस्त्र झाल्याची भावना स्थानिकांत आहे.

मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात रुग्णवाहिका ही जीवनरेखा मानली जाते; मात्र त्याच जीवनरेखेनेच रुग्णांना रस्त्यात सोडणे, ही आरोग्य सेवेच्या उभारणीतील सर्वात लज्जास्पद बाब ठरत आहे. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे.

The post “इथे ओशाळली माणूसकी” बाळंतीणेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले,मोखाड्यात प्रशासनाचा भोंगळ कारभाराचे भयाण उदारण appeared first on Satara Pratinidhi.