
दौलाताबाद प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गांवर महामार्गाच्या पुलाच्या मधोमध असलेल्या स्लॅबला मोठे भागदाड पडून स्लॅब कोसळला सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी (ता.06) घडली. माळीवाडा गावाजवळ मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून तीन ते चार वर्ष झाले. तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यामुळे महामार्गाचे काम निकृष्ठ असल्याचे लक्षात आले होते. आता तर पुलाचा स्लॅब कोसळून मोठे भागदड पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या वेरूळ (माळीवाडा) इंटरचेंजनजीक ३ धुळे सोलापूर महामार्गवरून जाणारा समृद्धीचा हा पूल आहे. या महामार्गासाठी एम-४o ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला असून माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे.
यासह दोन्ही बाजूने असलेले सर्हिस रस्ते सुद्धा अत्यंत निकृष्ठ झाले आहेत. एका वर्षातच हे रस्ते होत्याचे नव्हते झाले आहे, संरक्षक भिंतीसुद्धा अपूर्ण स्थितीत असून, शेजारी केलेले तार कपाउंड सुद्धा चोरीस गेले आहेत. महामार्ग मधून गेल्याने शेतकऱ्यांसाठी शेतात कुठून जावे असे गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहे.
त्यावर रस्तेविकास महामंडळ, व भुसपादन विभाग या शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाहीत. अश्या अनेक प्रकारच्या समस्या जैसेथे असून मोठा गाजा वाजा करून निर्माण केलेला महामार्ग, अपघातामुळे सुद्धा नेहमीच चर्चेत राहिला आहे. वरवर दिसायला चांगला दिसत असला तरी या महामार्गच्या गुणवत्तेचा प्रश्न आता उपस्तित होत आहे.
हा मार्ग नागपूर-मुंबइं हा 750 किलोमीटरचा असा हा समृद्धी मार्ग 11 जिल्ह्यांतून गेला आहे हा संपूर्ण मार्ग सिमेंट क्राँक्रिटचा केला आहे. रस्त्याला कुठेही वळण नसल्याने रस्ता सरळ आहे. औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील 59 गावांमधून केले जाणार आहे. हा 300 मीटरचा रस्ता आठपदरी असून, त्यासाठी एक हजार 380 हेक्टर जमिनीचे संपादन केले आहे.