
मुंबई प्रतिनिधी
शरिरसंबंधांना नकार दिला म्हणून पतीनं पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. यामध्ये पत्नी ७० टक्के भाजली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण ज्यावेळी हा प्रकार घडला आहे, तो ऐकून तुमचाही संताप होऊ शकतो.
नेमकी घटना काय?
मुंबईतील चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काल अर्थात 30 मे 2025 रोजी ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये 38 वर्षीय महिला सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना, तिच्या पतीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला. याला संबधित महिलेनं नकार दिल्यामुळं, संतापलेल्या पतीनं रागाच्या भरात तिच्यावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिलं. या घटनेत पीडित महिला 70 टक्क्यांहून अधिक भाजली असून, सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.