
पालघर प्रतिनिधी
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या लोकसभा संघटक पदावर कार्यरत असलेले नंदकुमार पाटील यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, संबंधित घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून झालेल्या या वादात संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली आणि मारहाण होत असताना ती विवस्त्र झाली, असा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये मारहाणीचा स्पष्ट व्हिडिओ आढळून आला आहे.
या प्रकरणी नंदकुमार पाटील आणि त्यांच्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाडा पोलीस तपास करत आहेत. नेमका जमिनीचा वाद काय होता, याचा तपासही सुरू आहे.
दरम्यान, राज्यात महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी होत आहे.