
जळगाव प्रतिनिधी
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची धिंडवडे निघाले असताना
चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी महिलेला योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने भररस्त्यात बाळाला जन्म द्यावा लागला.
या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहिणी खडसे यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “आपण ऐकत आहोत की भारत जगात चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, जपानलाही मागे टाकलं आहे. पण या विकासाच्या गाजावाजाच्या घोषणांमध्ये, आपल्या राज्यात एक बाई रस्त्यावर बाळंत होतेय, ही किती मोठी शोकांतिका आहे!”
एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टीमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीन रस्त्यावर प्रसूत होत आहे.अजून किती दिवस माझ्या लाड़क्या बहिनीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेडसांड होत राहिल. घटना ही… pic.twitter.com/X5nwCBU2zY
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 28, 2025
चार मंत्री असलेल्या जिल्ह्याची शरमेची गोष्ट
खडसे पुढे म्हणाल्या, “ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे, जिथे चार मंत्री आहेत, पण तरीही आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर त्या महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. परिणामी तिला रस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. हे चित्र किती भयावह आहे, यावर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं.”
खोट्या प्रगतिशीलतेवर रोष
खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारवर रोष व्यक्त करत लिहिलं, “आजही माझ्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर बाळंत व्हावं लागत असेल, तर ही प्रगत भारताची जाहिरात खोटेपणाचं उत्तम उदाहरण आहे. आपण यावर मिरवण्याऐवजी लाज वाटायला हवी.” घटनेनंतर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि मंत्री यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
रोहिणी खडसेंची पोस्ट काय?
“एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टीमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीन रस्त्यावर प्रसूत होत आहे.अजून किती दिवस माझ्या लाड़क्या बहिनीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेडसांड होत राहिल. घटना ही जळगांव जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यातील बोरमळी येथिल आहे.” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केली आहे.