
नागपूर प्रतिनिधी
गांजा तसेच अमली पदार्थांची तस्करी व विक्री करण्याच्या घटनांत वाढ झाली असताना गांजा अमली पदार्थ विक्री होताना दिसून येत आहे.
अशाच प्रकारे नागपूरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत तीन जणांना लकडगंज पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
च्याकडून जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये मागील काही दिवसांपूर्वी नागपूर विमानतळावर कार्गो पार्सलमधूल गांजा तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर पुन्हा नागपूरमध्ये सर्रासपणे गांजा विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अर्थात यावर बंदी असताना देखील गांजा कोठून आणला जातो आणि त्याची विक्री देखील केली जाते कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान नागपूरच्या गंगा- जमुना परिसरात काही इसम दुचाकीने गांजाची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. मोहम्मद शरीक, सोहेल शेख यांच्या जवळ दोन किलो गांजा, तीन मोबाईल, अॅक्टीव्हा आणि स्प्लेंडर मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती समोर आली.
दोन लाखांच्या मुद्देमाल हस्तगत
यातील त्यांचा तिसरा साथीदार असलेला आरोपी नयन ढोके याला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींनी गांजा कुठून आणला आणि कोणाला देणार होते; याचा तपास पोलीस करत आहे. शिवाय यात काही मोठी साखळी असण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.