
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे केवळ राजकीय नेते म्हणून सर्वपरिचित नाही तर त्यांच्या काही सिग्नेचर स्टाईल्समुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतात.
भाषणादरम्यान, आपल्या शर्टाची कॉलर कित्येकदा उडवताना उदयनराजे भोसले पाहायला मिळाले आहे. सध्या उदयनराजे एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांनी चालवलेली थार…
खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांची नवीन थार चालवली असल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांनी नुकतीच नवीन थार जीप विकत घेतली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी स्वतः ती थार चालवत सातारा शहरातून सफर केली आहे. दरम्यान, साताऱ्यात कोणीही नवं वाहन घेतलं की, उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्या वाहनाचं पूजन ते करून घेतात. यासह ते उदयनराजे भोसले यांना एक राईडही देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.