
सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांपर्यंत तात्काळ माहिती, सुचना वा तक्रारी पोहोचवता याव्यात, यासाठी सातारा जिल्हा पोलिस विभागाने ‘सी. यु. जी.’ (Common User Group) या नवकल्पनेची अंमलबजावणी केली आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री), मा. जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री), मा. मकरंद जाधव-पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री), जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सेवेमार्फत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुख यांना विशिष्ट सी. यु. जी. मोबाईल नंबर व हँडसेट देण्यात आले आहेत. नागरिकांनी या क्रमांकांवर WhatsApp किंवा SMS द्वारे कोणतीही माहिती, तक्रार वा सुचना २४x७ पाठवू शकतात. या सेवेमुळे नागरिकांच्या सहभागातून गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे.
पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा केवळ शासकीय कामकाजासाठी असून नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख अधिकाऱ्यांचे CUG मोबाईल नंबर (संपूर्ण यादी):
पोलीस अधीक्षक, सातारा – 9223006101
अपर पोलीस अधीक्षक – 9223006102
पोलीस निरीक्षक, सातारा शहर – 9223006104
पोलीस निरीक्षक, कोरेगाव – 9223006113
पोलीस निरीक्षक, सायबर – 9223006123
पोलीस निरीक्षक, महाबळेश्वर – 9223006148
… (संपूर्ण यादीसाठी संपर्क साधा)
नागरिकांनी WhatsApp व SMS चा जास्तीत जास्त वापर करावा व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.