
वृत्तसंस्था
आयपीएल 2025 मधील 47 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभवने सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे गुजरात टायटन्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक लोकलं.
वैभवने या शतकासह अनेक विक्रम रचले आहेत. वैभव आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच वैभवने या शतकासह अनेक विक्रम केले आहेत. वैभवने अवघ्या 35 चेंडूत हे शतक केलं. वैभवने यासह यूसुफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला. यूसुफ पठाण याने 37 चेंडूत शतक झळकावलं होतं.
वैभवचं अर्धशतक ते शतक
वैभवने राजस्थानच्या डावातील पाचव्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. वैभवने यासह आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं आणि ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अवघ्या 17 चेंडूत हे अर्धशतक केलं. वैभवने या खेळीतील 48 धावा या फक्त 9 चेंडूत षटकार आणि चौकारांच्या मदतीने केल्या. वैभवने 300 च्या स्ट्राईक रेटने 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने अर्धशतकापर्यंत मजल मारली. त्यानंतर वैभवने आणखी वेगाने धावा केल्या. वैभवने अर्धशतक ते शतक हा प्रवास हा अवघ्या 18 चेंडूत पूर्ण केला. वैभवने 285.71 च्या स्ट्राईक रेटने 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. वैभवचं हे या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं.
वैभवचं विक्रमी शतक
वैभवने वयाच्या 14 वर्ष 32 व्या दिवशी ही शतकी खेळी केली. वैभव यासह आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय ठरला. ख्रिस गेल याने 2013 साली 30 चेंडूत शतक केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी आता वैभवने ही कामगिरी करुन दाखवली. तसेच वैभवने 11 षटकारांसह आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. वैभव या स्पर्धेत एका डावात सर्वाधिक 11 षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूही बनला आहे. या खेळाडूने 2008 मध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणचा विक्रम मोडला
सूर्यवंशीने गुजरातविरुद्ध 11 षटकार ठोकत मुरली विजयचा विक्रम मोडला.