बिड प्रतिनिधी
बिडचे फरार निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले बीड पोलिसांसमोर शरण येणार आहेत. रणजित कासले यांनी सोशल मीडियावर नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी मी बीड पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती दिली.
कालच रणजित कासले यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मला पकडूनच दाखवा असे आवाहन पोलिसांना केले होते. पण आता त्यांनी मी शरण येणार असल्याचे सांगितले आहे.
रणजित कासले यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, ‘मी कालपासून माझ्या कमेंट्स वाचल्या त्यानंतर मी काही पत्रकार मित्र, वकील आणि काही पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मला असे जाणवले की पळून काही उपयोग होणार नाही. मी आजपर्यंत कुठल्याही संकटाचा आजपर्यंत सामना केला आहे. त्याप्रमाणे मी आता याला देखील सामोरे जाणार आहे. मी महाराष्ट्र पोलिस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सिस्टिमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवले आहे.’
रणजित कासले यांनी पुढे सांगितले की, ‘मी लवकरच माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे. मला कॉल करून त्रास देऊ नका. मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचून रिप्लाय देईल. मी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनंजय मुंडे आणि ते वॉशिंग मशिनमधून क्लिन होऊन बाहेर येणार आहेत.’असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
तसंच याच्यामध्ये बळी जाणार तर तो माझाच जाणार आहे. माझ्याविरोधातच गुन्हे दाखल होणार आहे. आता तर एक दाखल झाला आणि आता आणखी दोन-चार होतील. त्यामुळे मी आता सामोरे जाणार आहे. आता मी बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. त्यांनी मला पकडले तरी काही हरकत नाही. कारण ते माझे डिपार्टमेंट आहे मी डिपार्टमेंटचे मीठ खाल्ले आहे. हजर होऊन मी ही लढाई लढतच राहणार आहे. जे जे काही आरोप मी केले आहेत ते मी सिद्द करून दाखवणारच आहे.’ , असे देखील रणजित कासले यांनी सांगितले.


