
मुंबई प्रतिनिधी
हाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आली असून, उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली.
जळगावमध्ये बुधवारी ४३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्याशिवाय विदर्भ, मराठवाड्यातही सर्वच शहरांत ४० अंशाच्या पुढे तापमान राहिले. उष्णतेची हिच लाट अजूनही काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कुठे किती होते तापमान?
पुणे -४०.७ °C
लोहेगाव – ४२.२ °C
जळगाव – ४३.७ °C
कोल्हापूर – ३७.८ °C
महाबळेश्वर – ३३.३ °C
मालेगाव – ४३.२ °C
नाशिक – ४१.३ °C
सांगली – ३७.९ °C
सातारा – ३९.७ °C
सोलापूर – ४०.०१ °C
मुंबई – ३३.९ °C
सांताक्रूझ – ३३.७ °C
अलिबाग – ३५.२ °C
रत्नागिरी – ३५.६ °C
पणजी – ३५ °C
डहाणू – ३६.२ °C
औरंगाबाद – ४२.५ °C
परभणी- ४०.९ °C
अकोला – ४३.७ °C
बुलढाणा -३९.६ °C
चंद्रपूर – ४२.२ °C
गोडिया – ३८.६ °C
नागपूर – ४०.५ °C
वाशिम – ४१.४ °C
वर्धा- ४१.० °C
घराबाहेर न पडण्याचा सल्ला
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. अनेक शहरांतील तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपरणे, कापड, स्कार्फचा वापर केला जात आहे. थंड पेयांची मागणीही वाढली आहे. मात्र उन्हाच्या झळया जास्त लागत असल्याने १२ ते ३ या वेळेत घराबाहेर न फिरण्याचा सल्ला दिला जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्वचेचे आजारही बळावल्याचे सांगितले जाते.