
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकींच्या हालचालींना वेग आला आहे.महायुती व मविआ ने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.काँग्रेसची साथ सोडून गेलेले झिशान सिद्दीकी यांनी उमेदवारांची यादी पाहिल्या नंतर सोशल मीडिया पोस्ट केल्यानं.जनतेनंच त्यांना सुनावलं आहे
झिशान सिद्धीकी अजित पवार गटात आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ‘सुना है पुराने दोस्तों ने वांद्रा ईस्ट में अपना उम्मीदवार घोषित कर दिया है । साथ निभाना तो कभी इनकी फितरत में था ही नहीं.’ रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे, मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं.’ अब फैसला जनता लेगी!’
मुंबईच्या वांद्रे पूर्व विधानसभेच्या उमेदवाराबाबत महाविकास आघाडीच्या निर्णयाची थोडीशी खंत जीशान सिद्दीकी यांना असावी, कदाचित त्यामुळेच झिशान सिद्दीकी यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अशा पद्धतीची पोस्ट केली.
रात्री त्यांनी या पोस्टमधून लोकांना बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यातून मनातलं दुःख आणि संतापही जाणवत होता. आता त्यांच्या या पोस्टवर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार NCP(SP) किंवा उद्धव सेनेच्या (SS-UBT) कोणत्याही नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी मात्र त्यांना खूप ट्रोल केलं आहे.
‘तुला आता कळलं का? जेव्हा पक्षाला तुझी खूप गरज होती तेव्हा तुम्ही साथ सोडली. तुमच्या प्रोफाइलवर तुम्ही पक्षाचं नावही ठेवलं नाही. आता तुम्हाला या गोष्टींचा राग येतोय जेव्हा ते तुमच्या बाबत घडतंय. स्वत: चं तर पाहात नाही आणि दुसऱ्यांना दोष देत सुटतात, लाजही वाटत नाही’ अशा तिखट शब्दात एका युजरने सुनावलं आहे.
जुन्या मित्राने तुमच्यासाठी ती जागा सोडायला हवी होती असं तुम्हाला वाटत होतं का, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे ती वेगळी गोष्ट आहे. हे राजकारण आहे, इथे समोरासमोर येऊन लढावं लागतं असं डॉक्टर मोनिका सिंह नावाच्या युझरने सुनावलं आहे. झिशान यांच्या या पोस्टवर युजर्सने खूप ट्रोल आणि टीका केली आहे.