
वार्ताहर – स्वप्नील गाडे
महायुती मधील मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)गट.यांच्या कडून धारावी विधानसभा मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व केंद्रीय मंत्री खासदार मा.रामदासजी आठवले यांचे जवळचे एकनिष्ठ लढवय्या पँथर अशी ओळख असलेले मा.सिध्दार्थजी कासारे यांना त्यांचा असलेला बालेकिल्ला धारावी विधानसभेतून आज शनिवार दि-२६/१०/२०२४ रोजी सायंकाळी ९ वाजता उमेदवारी जाहीर झाली आहे.या धारावी विधानसभेत सिध्दार्थ कासारे हे अनेक वर्ष दलित समाजाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
आंदोलने असो,धारावीतील चळवळ असो व सामाजिक कार्ये यात सिध्दार्थ कासारे यांचा पहिला सहभाग आहे. याच कार्यशैली मुळे कासारे यांचा धारावी विधानसभेत जनसंपर्क खूप अधिक वाढला आहे.याच जनसंपर्काच्या जोरावर सिध्दार्थ कासारे यांना महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर धारावी मधून उमेदवारी जाहीर केली आहे याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येउशकत नाही.