
प्रतिनिधी स्वप्नील गाडे
वांद्रे: गौतमनगर येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना वांद्र्यातच घरे मिळावीत, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि स्थानिक आमदार वरून सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना केली आहे.
सरदेसाई यांनी सांगितले की, रहिवाशांचे पुनर्वसन हे त्यांच्या सध्याच्या रहिवासी परिसरातच होणे आवश्यक आहे. त्यांना उपनगर किंवा दूरस्थ भागात हलविणे हे अन्यायकारक ठरेल. रहिवाशांचे रोजगार, शाळा आणि दैनंदिन जीवन वांद्र्यातीलच असल्याने त्यांना इथून हलवू नये, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनीही सरदेसाई यांना पाठिंबा दर्शवला असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे.