
ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशास पात्र असून शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी दि.15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि.15 मार्च 2025 या मुदतीच्या अगोदर सादर करावेत तसेच अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि. ठाणे – 400605 या कार्यालयास जमा करावी, असे आवाहन ठाणे समाज कल्याणचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.