
मुंबई प्रतिनिधी
परिवहन मंत्री प्रताप सरानाईक यांनी रिक्षा चालकांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे. 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या रिक्षा चालकांसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण केलं आहे. या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत. त्यांना पुरस्कार दिले जणार आहेत. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांहून अधिक वय असलेले काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत. याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल. हे अनुदान आम्ही एकदाच देणार आहोत. 10 हजार पुरस्कार म्हणून एकदाच देणार आहोत. आमच्या विभागाने माहिती काढली आहे. राज्यात सध्या 14 हजार 387 रिक्षाचालक हे 65 वर्षांवरील आहेत. त्यांना यावर्षी 10 हजारांची रक्कम देणार आहोत”, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते मुंबई पार पडलेल्या आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलत होते.
प्रताप सरनाईक म्हणाले, ज्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदेनी आनंद दिघे यांच्या नावाने मंडळ स्थापन केले. आम्ही आता निर्णय घेतलाय की, 27 जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल. 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आलेली आहे. ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ’, असं त्याचं नाव असणार आहे. आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा मार्च महिन्यात करणार आहोत. मार्चमध्ये परिवहन दिवस असतो, त्यादिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल तेव्हा लोगोचे प्रकाशन केले जाईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.