विटा : प्रदीप जोशी
मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळतो आहे की नाही, याचा नियमित आढावाही विभागाकडून घेतला जात आहे.
परीक्षा शुल्कमाफीचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, जनसंपर्क अधिकारी किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.
विद्यापीठनिहाय संपर्क क्रमांक
मुंबई विद्यापीठ, मुंबई : डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), अजय ठुबे (७५८८१६९१३४).
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), डॉ. काळवणे (७०२०६३४५०२).
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१).
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), महाले (९८२३१९२८३१).
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ : डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५).
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९).
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई : संजय नेरकर (९९२२४४४४६७), डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९).
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक : डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).


