हैदराबाद :
परदेशातून सोने आणण्यासाठी लोक अशा काही आयडिया शोधून काढतात की, तपास पथकंही थक्क होऊन जातात. पण असे असूनही हे सराईत गुन्हेगार सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.
परदेशातून सोने लपवून आणण्याचा असाच एक प्रयत्न हैदराबाद कस्टम विभागाने हाणून पाडला आहे. हे प्रकरण राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (RGI) आहे. येथे दोन प्रवाशांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे लोक 3.36 कोटी रुपयांचे सोन्याचे पेस्ट (गोल्ड पेस्ट) जीन्समध्ये लपवून आणत होते.
Taskaree
Hyderabad Customs Seizes 2.2 Kg Gold Worth ₹3.36 Crore at RGIA; Two Passengers Arrested
Intelligence-led operation at airport
Hyderabad Customs’ Air Intelligence Unit (AIU) seized 2.271 kg of 24 KT gold worth about ₹3.36 crore at Rajiv Gandhi International Airport… pic.twitter.com/JE3zUjfdbl
— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) June 25, 2026
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ‘अॅडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम’ (APIS) कडून मिळालेली अचूक माहिती आणि ‘डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस’ (DRI) कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुआलालंपूरहून हैदराबादला आलेल्या दोन्ही भारतीय प्रवाशांना तपासणीसाठी रोखले.
जीन्समध्ये लपवले सोन्याचे पेस्ट
जेव्हा दोघांची कसून झडती घेण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांना त्यांच्या कपड्यांमध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्यांनी जेव्हा बारकाईने तपासणी केली, तेव्हा सोने लपवण्याची चलाख पद्धत समोर आली. तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाशांनी सोन्याचे पेस्ट बनवून ते खास पद्धतीने शिवलेल्या पाऊचमध्ये भरले होते. त्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाची सेलोफेन टेप चांगल्या प्रकारे चिकटवली होती.
बेल्टच्या जागी लपवले 2 किलोपेक्षा जास्त सोने
हे पाऊच दोन्ही प्रवाशांनी त्यांच्या जीन्स पँटच्या बेल्टच्या जागी आतमध्ये अत्यंत हुशारीने लपवून ठेवले होते. सोने पेस्टच्या स्वरूपात असल्याने अधिकाऱ्यांनी मदतीसाठी स्थानिक सोनाराला पाचारण केले. त्यानंतर शुद्ध सोने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बाहेर काढलेल्या सोन्याची तपासणी सरकारमान्य मूल्यांककाकडून (व्हॅल्यूअर) करण्यात आली. त्यांनी सांगितले की, 24 कॅरेट सोन्याचे वजन 2.271 किलो आहे आणि बाजारामध्ये याची किंमत सुमारे 3.36 कोटी रुपये आहे.
दोन प्रवासी अटक, मुख्य तस्कराचा शोध सुरू
सोने जप्त केल्यानंतर दोन्ही प्रवाशांना कस्टम्स अॅक्ट, 1962 अंतर्गत अटक करण्यात आली. हैदराबाद कस्टम्स आता यामागे कार्यरत असलेल्या संभाव्य तस्कर टोळ्यांचा शोध घेण्यासाठी तपास करत आहे. ही घटना 24 जून रोजी घडली आहे.


