नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षात (आप) उभी फूट पडली असून, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | Delhi: Addressing a press conference with Sandeep Pathak and Ashok Mittal, AAP MP Raghav Chadha says, "We have decided that we, the 2/3rd members belonging to the AAP in Rajya Sabha, exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP." pic.twitter.com/K3IK4TPXml
— ANI (@ANI) April 24, 2026
राघव चड्ढा यांनी आज (२४ एप्रिल) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. संविधानातील तरतुदीनुसार पक्षाचे राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार भाजपात विलीन होत असल्याचे खासदार चड्ढा यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
आपला मोठा धक्का
काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाची वाढती जवळीक पाहता पक्षाने त्यांना पदावरुन हटवल्याचे स्पष्टीकरण आपने दिले होते. चड्ढा भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरु होत्या मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, आता चड्ढा यांनी पत्रकार परिषदेतून भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि पर्यायाने ‘आप’ला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपात जाणारे ते सात खासदार कोणते?
खासदार राघव चड्ढा यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यसभेतील पक्षाते दोन तृतीयांश खासदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत’. राघव चड्ढा यांच्या व्यतिरिक्त,
भाजपामध्ये सामील होणाऱ्या खासदारांमध्ये
स्वाती मालीवाल,
हरभजन सिंग,
संदीप पाठक,
अशोक मित्तल,
राजिंदर गुप्ता
विक्रम साहनी
यांचा समावेश आहे. राज्यसभेत असणाऱ्या आपच्या १० पैकी एकूण सात खासदार भाजपात प्रवेश करण्यास तयार असल्याचे चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाहा कोणकोणते खासदार जाणार भाजपमध्ये
राघव चड्ढा यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये स्वाती मालिवाल, अशोक मित्तल आणि संजीव अरोरा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
स्वाती मालिवाल: जानेवारी 2024 मध्ये निवडून आल्या आहेत.
अशोक कुमार मित्तल: पंजाब.
संजीव अरोरा: पंजाब
संदीप पाठक: पंजाब
हरभजन सिंह: पंजाब
बलबीर सिंग सीचेवाल: पंजाब
विक्रमजीत सिंग साहनी: पंजाब
आपवर आरोप
“ज्या आम आदमी पक्षाला मी माझे रक्त आणि घामाने वाढवले, माझ्या तारुण्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता पक्षाची तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. आता हा पक्ष राष्ट्राच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करतोय”, असा आरोप राघव चड्ढा यांनी केला. “मी योग्य व्यक्ती असूनही चुकीच्या पक्षात आहे, असे मला गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते. तेव्हा आज मी ‘आप’पासून स्वतःला दूर करत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे असे जाहीर करतो”, असे चड्ढा म्हणाले.
खासदार राघव चड्ढा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या सर्व घडामोडींवर आता आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट करत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपाकडून पुन्हा पंजाबच्या जनतेबरोबर धोका’, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.


