डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली : शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २२ वर्षीय तरुणीवर तिच्याच ओळखीतील तीन रिक्षाचालकांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यांनी तत्पर कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची येथील रहिवासी असून ती डोंबिवलीतील एका सुरक्षा रक्षक एजन्सीत कार्यरत आहे. तिची ओळख परिसरातील काही रिक्षाचालकांशी झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा परिसरातील एका फ्लॅटवर बोलावले.
पार्टीच्या बहाण्याने अत्याचार
पार्टी संपल्यानंतर आरोपींनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेने धीर एकवटत थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पथके रवाना केली.
अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना शोधून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चेतन चौहान, हेमंत चौहान आणि उमेश वर्मा अशी आहेत. तिघेही डोंबिवली परिसरात रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे डोंबिवलीत महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


