सातारा प्रतिनिधी
ज्ञानविकास मंडळ, सातारा यांच्या वतीने यंदाचा ३६ वा आदर्श माता सत्कार समारंभ मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ साताऱ्यातील प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध ज्योतिषाचार्य व प्राचार्य रमणलाल शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निवड झालेल्या तीन आदर्श मातांचा गौरव करण्यात येणार आहे.
यंदा आदर्श माता म्हणून निवड झालेल्या मातांमध्ये
• श्रीमती अलका विजय जोशी (सातारा)
• सौ. सुजाता अशोक सोनवणे (मु.पो. पिंपरी, ता. खटाव, जि. सातारा)
• श्रीमती मुग्धा विजय सोहोनी (सातारा)
यांचा समावेश आहे.
समारंभात या तिन्ही मातांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, गौरवपत्र, सातारी कंदी पेढे तसेच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या आनंददायी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.


