नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून देशभरातून एकूण ९५८ उमेदवारांनी यश मिळवले आहे. या यादीत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांनी यश संपादन केले असून पहिल्या १०० मध्ये राज्यातील पाच उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. त्यामध्ये ऋषीकेश आलासे यांनी राज्यातून अव्वल कामगिरी करत देशात ६१ वा क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७) आणि दीक्षा पाटकर (८८) यांनीही टॉप १०० मध्ये स्थान मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून अनेकांनी पहिल्याच प्रयत्नात तर काहींनी अनेक वर्षांच्या परिश्रमांनंतर यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार
हृषीकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).
ऑगस्टमध्ये मुख्य परीक्षा, नंतर मुलाखती
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त पदांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम निकालानुसार ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
यामध्ये सामान्य प्रवर्गातील ३१७, आर्थिक मागास (ईडब्ल्यूएस) १०४, इतर मागासवर्गीय (ओबीसी) ३०६, अनुसूचित जाती (एससी) १५८ आणि अनुसूचित जमाती (एसटी) ७३ उमेदवारांचा समावेश आहे. तसेच आयोगाने २५८ उमेदवारांची राखीव यादी (रिझर्व्ह लिस्ट) तयार केली असून त्यात विविध प्रवर्गांतील उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय तीन दिव्यांग उमेदवारांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विविध सेवांमध्ये इतक्या जागा
या निकालाच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केंद्र सरकारच्या विविध सेवांमध्ये करण्यात येणार आहे.
∆भारतीय प्रशासन सेवा (IAS) : १८० जागा
* सामान्य – ७४
* ईडब्ल्यूएस – १८
* ओबीसी – ४७
* एससी – २८
* एसटी – १३
∆भारतीय विदेश सेवा (IFS) : ५५ जागा
* सामान्य – २२
* ईडब्ल्यूएस – ६
* ओबीसी – १५
* एससी – ८
* एसटी – ४
∆भारतीय पोलिस सेवा (IPS) : १५० जागा
* सामान्य – ६०
* ईडब्ल्यूएस – १५
* ओबीसी – ४२
* एससी – २२
* एसटी – ११
* केंद्रीय सेवा गट ‘अ’ : ५०७ जागा
* केंद्रीय सेवा गट ‘ब’ : १९५ जागा
उमेदवारांच्या गुणानुक्रमानुसार या सेवांमध्ये नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. आयोगाने स्पष्ट केले की ३४८ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची (प्रोव्हिजनल) आहे. अंतिम नियुक्तीपूर्वी आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
दरम्यान, सविस्तर निकाल व यशस्वी उमेदवारांची संपूर्ण यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षेतील यशामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


