नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, होमगार्ड व सुधारात्मक सेवांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शौर्य व सेवा पदकांची घोषणा केली आहे.
यंदा देशभरातील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींतील पदके जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्तव्य बजावताना दाखवलेले धैर्य, निष्ठा, प्रामाणिक सेवा आणि समाजहितासाठी केलेले योगदान लक्षात घेऊन हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
* वीरता पदक (Gallantry Medal – GM) : पोलीस सेवा
महाराष्ट्रातील ३१ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीरता पदक जाहीर झाले आहे. यामध्ये कर्तव्य बजावताना प्राणाची बाजी लावणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे.
१) अमोल नानासाहेब फडतरे – सहाय्यक पोलीस निरीक्षक
२) वासुदेव राजम मडावी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३) मधुकर पोचाय्या नैताम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
४) संतोष वसंतराव नैताम – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
५) कै. सुधाकर बिताजी वेलादी – नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर)
६) विलास मारोती पोर्तेट – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
७) विश्वनाथ सन्यासी सदमेक – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
८) ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
९) दिलीप वासुदेव सदमेक – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१०) रामसू देवू नरोटे – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
११) आनंदराव बाजीराव उसेंडी – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१२) राजू पंडित चव्हाण – नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१३) अरुण कैलास मेश्राम – पोलीस कॉन्स्टेबल
१४) नितेश गंगाराम वेलाडी – पोलीस कॉन्स्टेबल
१५) मोहन लच्छू उसेंडी – पोलीस कॉन्स्टेबल
१६) संदीप गणपत वसाके – पोलीस कॉन्स्टेबल
१७) कैलास देवू कोवासे – पोलीस कॉन्स्टेबल
१८) हरिदास महारू कुलयेती – पोलीस कॉन्स्टेबल
१९) किशोर चंती तलांडे – पोलीस कॉन्स्टेबल
२०) अनिल रघुपती आलम – पोलीस कॉन्स्टेबल
२१) नरेंद्र दशरथ मडावी – पोलीस कॉन्स्टेबल
२२) आकाश अशोक उईके – पोलीस कॉन्स्टेबल
२३) कै. करे इरपा आत्राम – पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर)
२४) राजू मासा पुसाळी – पोलीस कॉन्स्टेबल
२५) महेश दत्तूजी जकेवार – पोलीस कॉन्स्टेबल
२६) रुपेश रमेश कोडापे – पोलीस कॉन्स्टेबल
२७) मुकेश शंकर सडमेक – पोलीस कॉन्स्टेबल
२८) योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक – पोलीस कॉन्स्टेबल
२९) घिस्सू वांजा आत्राम – पोलीस कॉन्स्टेबल
३०) अतुल भगवान मडावी – पोलीस कॉन्स्टेबल
३१) विश्वनाथ लक्ष्मण मडावी – पोलीस कॉन्स्टेबल
* विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) : पोलीस व सुधारात्मक सेवा-
* पोलीस सेवा-
१) महेश उदाजी पाटील – अतिरिक्त आयुक्त
२) बाळकृष्ण मोतीराम यादव – पोलीस उपायुक्त
३) सायरस बोमन इराणी – सहाय्यक पोलीस आयुक्त
४) विठ्ठल खंडुजी कुबडे – सहाय्यक पोलीस आयुक्त
* सुधारात्मक सेवा–
१) विजय बाबाजी परब – सुभेदार
२) राजू विठ्ठलराव हेटे – हवालदार
* उत्कृष्ट सेवेसाठी पदक (Meritorious Service Medal – MSM)-
* पोलीस सेवा (४०)
१) राजीव वीरेंद्र कुमार जैन – पोलीस महानिरीक्षक
२) सुधीर कल्ल्या हिरेमठ – पोलीस महानिरीक्षक
३) शीला दिनकर साहिल – पोलीस अधीक्षक
४) मोहन मुरलीधर दहीकर – पोलीस अधीक्षक
५) पुरुषोतम नारायण कराड – पोलीस अधीक्षक
६) किरण जितेंद्रसिंह पाटील – अतिरिक्त पोलीस अधीक्षक
७) नीलम प्रशांत वाव्हळ – पोलीस उपअधीक्षक
८) अविनाश शंकरराव शिळीमकर – निरीक्षक (पीए)
९) गजानन रामराव शेळके – पोलीस उपअधीक्षक
१०) महेश रमेश तावडे – सहाय्यक पोलीस आयुक्त
११) विजय मारोतीराव माहुलकर – अतिरिक्त पोलीस अधीक्षक
१२) समीर नारायण साळुंके – सहाय्यक पोलीस आयुक्त
१३) पराग बापूराव पोटे – पोलीस उपअधीक्षक
१४) दयानंद सदाशिव गावडे – पोलीस उपअधीक्षक
१५) पुष्पलता राजाराम दिघे – पोलीस उपअधीक्षक
१६) सुनील शंकर शिंदे – निरीक्षक (PH)
१७) सुवर्णा उमेश शिंदे – निरीक्षक (पीए)
१८) अनंत ज्ञानेश्वर माळी – पोलीस उपअधीक्षक
१९) महेंद्र दत्तात्रय कोरे – निरीक्षक / आरओ / आरएम
२०) कैलाश रामजी बाराभाई – निरीक्षक / आरओ / आरएम
२१) विजय गोपाळ मोहिते – उपनिरीक्षक
२२) भारत रावसाहेब सावंत – निरीक्षक / एआरएमआर
२३) नरेंद्र सखाराम राऊत – सहाय्यक उपनिरीक्षक
२४) सतीश जनार्दन निंबाळकर – उपनिरीक्षक
२५) अफजल खान शहेजादे खान पठाण – सहाय्यक उपनिरीक्षक
२६) प्रदीप साहेबराव सावंत – सहाय्यक उपनिरीक्षक
२७) सुभाष वामन साळवी – उपनिरीक्षक
२८) प्रमोद रोहिदास वाघमारे – निरीक्षक (पीए)
२९) विजयकुमार शंकर शिंदे – उपनिरीक्षक
३०) विक्रम व्यंकटराव नवरखेडे – उपनिरीक्षक
३१) विजय प्रभाकर देवरे – उपनिरीक्षक
३२) मनोज यशवंत गुजर – उपनिरीक्षक
३३) अजय मनोहर सावंत – उपनिरीक्षक
३४) गंगाधर रामचंद्र घुमरे – उपनिरीक्षक
३५) संजय एकनाथ शेलार – उपनिरीक्षक
३६) महादेव मधुकर खंडारे – निरीक्षक / एआरएमआर
३७) राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे – उपनिरीक्षक
३८) बाबासाहेब नाथा ढाकणे – उपनिरीक्षक
३९) शिवदास दत्तात्रय फुटाणे – उपनिरीक्षक
४) सुरेश साहेबराव सोनवणे – उपनिरीक्षक
* अग्निशमन सेवा (MSM)–
१) हरिश्चंद्र वसंत गिरकर – उपमुख्य अग्निशमन अधिकारी
२) दामोदर वनगड – अग्निशमन अधिकारी
३) कांचन बंडू पाटील – ड्रायव्हर ऑपरेटर
४)काशिनाथ राजनाथ मिश्रा – अग्रगण्य फायरमन
* नागरी संरक्षण व होमगार्ड (MSM)–
१) गंगाधर वखाजी वुरकुड – प्लाटून कमांडर
२) राजेंद्र मधुकरराव बन्सोड – प्लाटून कमांडर
३) नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली – प्लाटून कमांडर
* सुधारात्मक सेवा (MSM)–
१) अशोक शिवराम करकर – अधीक्षक
२) गोविंद केशव राठोड – अतिरिक्त अधीक्षक
३) राजेंद्र भाऊसाहेब धनगर – हवालदार
४) सुनील भाऊसो लांडे – हवालदार
५) प्रल्हाद महिपती शिंदे – हवालदार
कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेली ही पदके सेवाभाव, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा सन्मान असून, महाराष्ट्रातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


