मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सोमवारी (२९ डिसेंबर) सुरू झाला. महापालिका कार्यक्षेत्रातील सात ठिकाणी आयोजित सत्रांमध्ये मतदान नियमावली, ईव्हीएमची हाताळणी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी प्रशिक्षण सत्रांची पाहणी केली. ईव्हीएममधील बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची जोडणी, मॉक पोल, मतदानपूर्व व मतदानोत्तर कार्यवाही, कायदेशीर तरतुदी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सुमारे ५० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार असून, महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.


