कोल्हापूर प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आलेल्या या यादीत एकूण ४८ उमेदवारांचा समावेश असून, विविध प्रभागांमधील स्थानिक संघटनशक्ती, सामाजिक समतोल आणि निवडणूक गणित लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.राज्यातील मनपा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीर झालेली ही पहिलीच यादी ठरली आहे.
विशेष म्हणजे, या यादीत महिला, अनुसूचित जाती व नागरिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.निवड मंडळाच्या बैठकीत निर्णयमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठकप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीतखासदार शाहूजी छत्रपती महाराजविधानपरिषदेतील गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटीलआमदार जयंत आसगांवकरमाजी आमदार मालोजीराजी छत्रपतीमाजी आमदार ऋतुराज पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली.
-
कोल्हापूर महानगरपालिका – काँग्रेसची पहिली उमेदवार यादी
(प्रभाग, आरक्षण व उमेदवारांची नावे जशास तसे)
प्रभाग २ नागरिक मागास प्रवर्ग महिलाआरती दिपक शेळके
प्रभाग ३ नागरिक मागास प्रवर्गप्रकाश शंकरराव पाटीसर्वसाधारण महिला, किरण स्वप्निल तहसीलदार
प्रभाग ४ अनुसूचित जाती महिलास्वाती सचिन कांबळेनागरिक मागास प्रवर्ग, विशाल शिवाजी चव्हाणसर्वसाधारण महिला, दिपाली राजेश घाटगेसर्वसाधारण, राजेश भरत लाटकर
प्रभाग ५, सर्वसाधारणअर्जुन आनंद माने
प्रभाग ६, अनुसूचित जातीरजनिकांत जयसिंह सरनाईकसर्वसाधारण महिला, तनिष्का धनंजय सावंतसर्वसाधारण, प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
प्रभाग ७, सर्वसाधारण महिलाउमा शिवानंद बनछोडे
प्रभाग ८, नागरिक मागास प्रवर्ग महिलाअक्षता अविनाश पाटीलसर्वसाधारण महिला, ऋग्वेदा राहुल मानेसर्वसाधारण, प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकरसर्वसाधारण, इंद्रजित पंडितराव बोंद्रे
प्रभाग ९, सर्वसाधारण महिलापल्लवी सोमनाथ बोळाईकरविद्या सुनिल देसाईसर्वसाधारण, राहुल शिवाजीराव माने
प्रभाग १०, सर्वसाधारण महिलादिपा दिलीपराव मगदूम
प्रभाग ११, नागरिक मागास प्रवर्ग महिलाजयश्री सचिन चव्हाण
प्रभाग १२, नागरिक मागास प्रवर्गरियाज अहमद सुभेदारसर्वसाधारण महिला, स्वालिया साहिल बागवानसर्वसाधारण महिला, अनुराधा अभिमन्यू मुळीकसर्वसाधारण ईश्वर शांतीलाल परमार
प्रभाग १३, अनुसूचित जाती महिलापूजा भुपाल शेटेसर्वसाधारण, प्रविण हरिदास सोनवणे
प्रभाग १४, नागरिक मागास प्रवर्ग महिलादिलशाद अब्दुलसत्तार मुल्लासर्वसाधारण, अमर प्रणव समर्थसर्वसाधारण, विनायक विलासराव फाळके
प्रभाग १५, सर्वसाधारण महिलाआश्विनी अनिल कदमसर्वसाधारण, संजय वसंतराव मोहिते
प्रभाग १६, नागरिक मागास प्रवर्गउमेश देवाप्पा पोवारसर्वसाधारण, उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके
प्रभाग १७, अनुसूचित जाती महिलाअर्चना संदीप बिरांजेसर्वसाधारण महिला, शुभांगी शशिकांत पाटीलसर्वसाधारण, प्रविण लक्ष्मणराव केसरकर
प्रभाग १८, अनुसूचित जाती महिलाअरुणा विशाल गवळीसर्वसाधारण, भुपाल महिपती शेटेसर्वसाधारण, सर्जेराव शामराव साळुंखे
प्रभाग १९, अनुसूचित जातीदुर्वास परशुराम कदमसर्वसाधारण महिला, सुषमा संतोष जरगसर्वसाधारण, मधुकर बापू रामाणे
प्रभाग २०, अनुसूचित जाती महिलाजयश्री धनाजी कांबळेनागरिक मागास प्रवर्ग महिला, उत्कर्षा आकाश शिंदेनागरिक मागास प्रवर्ग, धिरज भिवा पाटीलसर्वसाधारण महिला, मयुरी इंद्रजित बोंद्रेसर्वसाधारण, राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)
महिला व मागास प्रवर्गाला प्राधान्ययादीत मोठ्या प्रमाणात
महिला उमेदवार,अनुसूचित जाती घटक,नागरिक मागास प्रवर्गातील प्रतिनिधीयांना संधी देण्यात आली असून काँग्रेसने सामाजिक प्रतिनिधित्वाचा संतुलित संदेश दिल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेतही हालचाली वेगानेमुंबईतील महायुती बैठकीतसुमारे २०० जागांवर एकमत,तर उर्वरित २७ जागांबाबत विरोधकांच्या घडामोडी पाहून उमेदवार घोषित होणारअशी माहिती समोर आली आहे.


