मुंबई प्रतिनिधी
हाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत राज्याच्या सत्ताधारी महायुतीने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले वर्चस्व राखले आहे.
भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदा नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपली पकड मजबूत ठेवली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही लक्षणीय जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला (MVA) काही मोजक्याच ठिकाणी यश मिळाले आहे.
कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी?
विदर्भ विभाग – १०० जागा
भाजप – ५८
शिवसेना शिंदे गट – ८
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ७
काँग्रेस – २३
शिवसेना ठाकरे गट – ०
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ०
इतर – ४
मराठवाडा विभाग – ५२ जागा
भाजप – २५
शिवसेना शिंदे गट – ८
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ६
काँग्रेस – ४
शिवसेना ठाकरे गट – ४
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – २
इतर – ३
उत्तर महाराष्ट्र विभाग – ४९ जागा
भाजप – १८
शिवसेना शिंदे गट – ११
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ७
काँग्रेस – ५
शिवसेना ठाकरे गट – २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – १
इतर – ५
पश्चिम महाराष्ट्र विभाग – ६० जागा
भाजप – १९
शिवसेना शिंदे गट – १४
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – १४
काँग्रेस – ३
शिवसेना ठाकरे गट – १
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ३
इतर – ६
कोकण विभाग – २७ जागा
भाजप – ९
शिवसेना शिंदे गट – १०
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – १
काँग्रेस – ०
शिवसेना ठाकरे गट – २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – १
इतर – ४
संपूर्ण महाराष्ट्र – नगराध्यक्ष /सदस्य
भाजप – १२९ /३३२५
शिवसेना शिंदे गट – ५१/६९५
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३५/३११
काँग्रेस – ३५/१३१
शिवसेना ठाकरे गट – ९/३७८
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ७/१५३
इतर – २२/१४०
मागील निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षांची संख्या –
भाजप – ९४
शिवसेना – ३६
काँग्रेस ५१
राष्ट्रवादी काँग्रेस – २९
इतर – २९
अपक्ष- २२


