नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे गेले काही आठवडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाने सर्व अंदाजांना छेद देत तरुण आणि संघटनात्मक अनुभव असलेले नेते नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करत मोठा आणि अनपेक्षित राजकीय डाव टाकला आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी नितीन नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
श्री नितिन नबीन जी ने एक कर्मठ कार्यकर्ता के रूप में अपनी विशिष्ट पहचान बनाई है। वे एक युवा और परिश्रमी नेता हैं, जिनके पास संगठन का अच्छा-खासा अनुभव है। बिहार में विधायक और मंत्री के रूप में उनका कार्य बहुत प्रभावी रहा है, साथ ही जनआकांक्षाओं को पूरा करने के लिए उन्होंने पूरे…
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2025
भाजपने रविवारी (१४ डिसेंबर) ही घोषणा केली. अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना नितीन नबीन यांचे नाव अपेक्षेच्या बाहेरचे मानले जात होते. मात्र, संघटनात्मक कामगिरी, निवडणूक व्यवस्थापनातील यश आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याची पक्षाची रणनीती लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
संघटनात्मक अनुभवाचा आधार
नितीन नबीन यांना अलीकडेच छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. संघटना आणि सरकार या दोन्ही पातळ्यांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सध्या ते बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
मैं माननीय प्रधानमंत्री जी, राष्ट्रीय अध्यक्ष जी, गृह मंत्री जी, रक्षा मंत्री जी और केंद्रीय नेतृत्व में सभी को हार्दिक धन्यवाद देता हूं और आभार व्यक्त करता हूं।
मुझे प्रधानमंत्री जी का आशीर्वाद प्राप्त है, और मैं उनके द्वारा दिए गए मार्गदर्शन और नेतृत्व को आगे बढ़ाऊंगा।
— BJP (@BJP4India) December 14, 2025
सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष
वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी नितीन नबीन हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पोहोचले आहेत. त्यामुळे हे पद भूषवणारे ते पक्षातील सर्वात तरुण नेते ठरले आहेत. याआधी अमित शहा यांनी वयाच्या ५०व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
पाच वेळा आमदार, बंकीपूरचा बालेकिल्ला
पाटण्यातील बंकीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितीन नबीन सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००६ मध्ये पाटणा पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीतून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ या निवडणुकांत त्यांनी बंकीपूरमधून विजय मिळवला. २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल ९८,२९९ मते मिळवत राजदच्या उमेदवाराचा ५१,९३६ मतांनी पराभव केला. हा त्यांचा आजवरचा सर्वात मोठा विजय मानला जातो. त्यांनी बिहार सरकारमध्ये दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
राजकीय वारसा आणि युवा मोर्चातून वाटचाल
नितीन नबीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार होते. त्यांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी भाजप युवा मोर्चामध्ये काम करत संघटनात्मक कौशल्य सिद्ध केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संदेश
स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहरा आणि संघटनात्मक ताकद या त्रिसूत्रीच्या आधारे भाजपने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. विशेषतः आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. नितीन नबीन यांच्या नेतृत्वामुळे उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये भाजपचे आकर्षण वाढू शकते, असा पक्षाचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरुण नेतृत्वाला पुढे आणत भाजपने केलेला हा मास्टरस्ट्रोक आगामी काळात पक्षाच्या राजकीय वाटचालीला कोणते वळण देतो, याकडे आता देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


