आंध्रप्रदेश:
आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. चित्तूर-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावरून प्रवास करणारी भाविकांची खासगी ट्रॅव्हलर बस अचानक नियंत्रणातून सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात नऊ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
आंध्र प्रदेश के चिंतूर पर खाई में गिरी बस इस
बस हादसे में 9 यात्रियों की दुखद मौत, 7 घायल।#Andhrapradesh pic.twitter.com/kwGxcobEjJ— Shailesh Verma (@shaileshvermasp) December 12, 2025
तेलंगणातील भद्राचलमहून अन्नावरमच्या दिशेने निघालेली ही बस घाटभागातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत लोटली. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेनंतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी धावून पोहोचली व जखमींना भद्राचलम एरिया हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी रात्री उशिरा दुर्घटनेची माहिती दिली. बस पूर्णपणे दरीत कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून रात्रभर बचावकार्य सुरू होते, असे ते म्हणाले.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य ती उपचार व्यवस्था करण्यात यावी,” असे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
घाटरस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.


